Crime News: हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील अन्नपूर्णाबाई कोंडिबाराव शिंदे या महिलेचा घरीच खून करण्यात आला. पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे.
हिमायतनगर : तालुक्यातील दुधड येथील एका महिलेचा राहत्या घरात अज्ञातांनी निर्घृण खून केल्याची घटना मंगळवारी (ता. नऊ) उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.