

Success Story
sakal
फुलवळ : बालपणीच मातृ-पितृ छत्र हरविलेले फुलवळ (ता.कंधार) येथील भावंडे नागनाथ संजय मंगनाळे (वय २०) याने हवाई दलात, तर साईनाथ संजय मंगनाळे (वय २२) याने भारतीय नौदलात दाखल होऊन यशाला गवसणी घातली. या भावंडांनी परिस्थितीची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यास, अपार मेहनत करून आई-वडील गमावल्यानंतर मामाने दिलेला आधारावर उराशी बाळगलेले आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.