Nagpanchami: नागबर्डीत तोडले जात नाही कडूलिंबाचे झाड! पिढ्यांनपिढ्यांपासूनची परंपरा, सातशे वर्षांच्या परंपरेची नागराजाची यात्रा आज
Nagpanchami Festival: नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील नागबर्डी येथे सातशे वर्षांपासून नागपंचमीच्या दिवशी नागराजाची यात्रा भरते. कडूलिंबाच्या झाडाभोवती असलेली लोकश्रद्धा आणि निसर्गसंवर्धन ही या परंपरेची वैशिष्ट्ये आहेत.
मारतळा (जि. नांदेड) : श्रावणातील पहिला सण नागपंचमी मंगळवारी (ता. २९) आहे. घरोघरी किंवा वारूळास्थळी जाऊन नागदेवतेची मनोभावे पूजा केली जाते. कंधार तालुक्यातील नागबर्डी येथे मात्र नागराजाची यात्रा भरते.