Naigaon Traffic Issue
sakal
नायगाव - शहरातील रुंद रस्ते असतानाही वाहन पार्किंगचा अभाव, रस्त्यावर फेरीवाले, विक्रेत्यांचे अतिक्रमण, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे बेशिस्त वाहनचालक, रिक्षाचालकांचे कुठेही असणारे थांबे यामुळे नायगावमध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. जागा मिळेल तेथे थांबणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या ही नित्याची झाली आही.