Nana Patole : लॉलीपॉप देऊन सरकार चालवताहेत ; नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

Nana Patole : लॉलीपॉप देऊन सरकार चालवताहेत ; नाना पटोले

नांदेड : "त्यांच्या दोन आमदारांना समजवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साडेतीन तास बसतात, हेच राज्य सरकारचे अपयश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बावनकुळे यांनी दिलेली उपमा खरीच आहे, पण ते गुजराती नेत्यांचे धनाजी आणि संताजी आहेत. लॉलीपॉप देऊन सरकार चालवत आहे. भ्रष्टाचारामध्ये आणि भयाने आलेले हे सरकार आहे. अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

भारत जोडो यात्रेत रविवारी विश्रांतीचा दिवस होता. सायंकाळी नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली. श्री. पटोले म्हणाले, "राहुल यांना जे लोक भेटायला येतात. त्यांच्या भावना तीव्र आहेत. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, हे ऐकून देशात किती अत्याचारी सरकार अस्तित्वात आहे, हे लक्षात येते. ही पदयात्रा नसून जनचळवळ झाली आहे. त्यामुळे भाजप या यात्रेला बदनाम करत आहेत.

सुमित्रा महाजन या यात्रेचे कौतूक करतायत, हे सांगताना त्यांचा व्हिडिओच ऐकवला. भाजपचे पितळ उघडे पडले आहे. लोक आपल्याला सत्तेतून बाहेर काढणार, हे त्यांना कळाले आहे. भारत जोडो यात्रेतील शेगावची सभा महाराष्ट्राचे नव्हे तर, देशाचे चित्र पालटवेल. तसेच विरोधकांच्या टीकेकडे आता लोकच दुर्लक्ष करत आहेत. देश जोडण्यासाठी कॉंग्रेसचे श्रेष्ठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. असे पटोले म्हणाले.

व्यस्थतेतून राहुल गांधी यांना वेळ मिळत नाही म्हणून ते दाढी करत नाहीत. पण पश्चिम बंगालची निवडणूक जिंकायची म्हणून रविंद्रनाथ टागोर यांच्यासारखी दाढी वाढवली, पण तिथे हरल्यावर दाढी जुन्या सेपमध्ये आली. तसेच देशाची संपती विकता म्हणून अडीच किलो शिव्या खात असाल. अरुणाचल प्रदेशमधील गावे चीन गिळंकृत करत आहेत. लोकांना आणि देशाला तोडताय, आम्ही मोदींना बोलत नाही, त्यांनी अंगावर घेऊ नये. असे म्हणत टोला लगावला.

राज्यातही अशीच पदयात्रा काढणार

यात्रेनंतर आम्ही कार्यकर्त्यांना कार्यक्रम देऊ. ते सक्रीय झाले आहेत. त्यांच्या जिद्दीचे आणि प्रामाणिकतेचे कौतूक आहे. राहुल गांधी यांची पदयात्रा काश्मीरमध्ये पोचली कि राज्यातही अशीच पदयात्रा काढू. दरम्यान, लोकल बॉडीच्या निवडणूका होऊन जातील. असे श्री. पटोले म्हणाले.

मुलींनी राजकारणात यावे असे वाटते : अशोक चव्हाण

भारत जोडो यात्रेत मी कमी आणि मुली जास्त चालल्या. त्या काश्मीर पर्यंत जायचे म्हणत होत्या. म्हटलं जरा थांबा (हसून). दोन्ही मुली सकाळी चारला उठून त्या राहुल गांधी यांच्यासोबत चालतात. मी केलेल्या ट्विटमध्ये पित्याची भावना होती. पुढची पिढी राजकारणात यावी असे वाटते, ते स्वभाविक आहे. राजकारणात यायचे कि, नाही यासाठी त्यांची इच्छा महत्वाची आहे. ते ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे. माझ्याविषयी आधीही भाजपात जाणार अशी चर्चा होती, आताही होतेय. सध्या आहे ना. असे म्हणत, याविषयी अधिक बोलणे अशोक चव्हाण यांनी टाळले.

टॅग्स :CongressNandedNana Patole