नांदेड : १५ आरोपींना अटक, सात लाखाचा मुद्देमाल जप्त- निलेश सांगडे

file photo
file photo

नांदेड : विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड शहर कार्यक्षेत्रात केलेल्या गुन्हा अन्वेषणांच्या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी नांदेड शहर परिसरातून १५ आरोपींना अटक केले. त्यांच्याकडून एक लाखाच्या मद्यासह सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता. सात) करण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यासह संबंध राज्यात लॉकडाउनची परिस्थिती आहे. आजही काहीअंशी लॉकडउनची परिस्थिती ता. ३१ आॅक्टोबरपर्यत आहे. मात्र कोरोनाशी सामना करत येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील देशी, हातभट्टी आदी अवैध धंद्याविरुद्ध धरपकड मोहीम राबवून अनेकांना अटक केली. तर काही सराईत गुन्हेगारांचा हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. 

सराईत गुन्हेगारांवर अनेकवेळा कारवाई

जिल्ह्यात देशी, हातभट्टी व रसायनमिश्रीत शिंदी यासह परराज्यातील बनावट मद्य विक्रीला येत असते. या काळ्या कारनाम्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाकाची करडी नजर आहे. अशा गोरखधंदा करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन आणि उत्पादन शुल्कचे विभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक निलेश सांगडे यांनी आपल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्‍वासात घेऊन जिल्हाभरात कारवाईचे सत्र सुरु केले. जिल्ह्यात देशी व हातभट्टी अवैधमार्गे विकल्या जाणारी असल्याने नाकाबंदी करुन हजारो लिटर हातभट्टी, रसायनमिश्रीत शिंदी आणि परराज्यातील बनावट मद्य जप्त केली आहे. जिल्ह्यातील किनवट, मुदखेड, माहूर, धर्माबाद, देगलुर, नांदेड, हिमायतनगर या तालुक्यामध्ये सर्वाधीक दारु संबंधाने गुन्‍हे घडतात. या भागातील सराईत गुन्हेगारांवर अनेकवेळा कारवाई करण्यात आलेली आहे. 

विशेष मोहीमेअंतर्गत नांदेड शहर कार्यक्षेत्रात केलेल्या गुन्हा अन्वेषणांची कारवाई 

एकूण गुन्हे- वारस गुन्हे- १५, अटक आरोपी-१५, देशी दारू-१६० लिटर (२१ बॉक्स), विदेशी दारू- ४३ लिटर
(पाच बॉक्स), ताडी, शिंदी- ४८० लिटर, वाहने- एक बोलेरो पीकअप, दोन दुचाकी जप्त मद्याची एकूण किंमत- एक लाख तीन हजार ३५० रुपये असा सहा लाख ८७ हजार २०० रुपये असा मुद्देमाल जप्त केला.

सदर कार्यवाहीमध्ये यांचे परिश्रम

निरीक्षक एस. एम. बोदमवाड, एस. एस. खंडेराय, ए. बी. चौधरी, ए. एम. पठाण,
दुय्यम निरीक्षक बी. एस. मंडलवार, श्रीमती जे. ए. गुट्टे, व्ही. बी. मोहाळे, ए. के. शिंदे, एस. व्ही. वाघमारे, व्ही. टी. खिल्लारे,जवान परमेश्वर नांदूसेकर, दिलीप नारखेडे, विकास नागमवाड, शिवदास नंदगावे, श्रीनिवास दासरवार, मारूती सुरनर, रविकांत फाळके, प्रवीण इंगोले, संतोष संगेवार, फाजील खतीब, रावसाहेब बोधमवड, अमोल राठोड महिला जवान श्रीमती टेंभुर्ने यांचा समावेश होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com