esakal | सुखद! नांदेडमध्ये केवळ दोघे जणच कोरोना पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus update

सुखद! नांदेडमध्ये केवळ दोघे जणच कोरोना पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे (Corona Test) प्रमाण कमी झाले होते. मंगळवारी (ता.२७ ) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी बुधवारी (ता. २८) प्राप्त झालेल्या एक हजार ८३२ अहवालापैकी जिल्हाभरात केवळ दोन व्यक्तींचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. यात महापालिका क्षेत्रातील एका व्यक्तीचा तर ग्रामीण भागातील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकुण कोरोना (Corona) पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९० हजार १६८ इतकी झाली आहे. बुधवारी दिवसभरात तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील (Corona Cases In Nanded) एकुण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ७४ हजार ४६३ इतकी झाली आहे. मागील दोन आठवड्यापासून जिल्हाभरात (Corona) एकाही बाधितांचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे बुधवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील एकुण कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या दोन हजार ६५५ वर स्थिर आहे. आज घडीला ५० कोरोना बाधितांवर औषधोपचार सुरु असून, त्यापैकी तीन बाधितांची प्रकृती गंभीर आहे.(nanded 2 covid cases reported positive glp88)

हेही वाचा: विक्की ठाकूर खून प्रकरण: नांदेडला आठ अट्टल गुन्हेगार जेरबंद

नांदेड कोरोना मीटर

एकुण बाधित - ९० हजार १६८

एकुण बरे - ७४ हजार ४६३

एकुण मृत्यू - दोन हजार ६५५

बुधवारी बाधित - दोन

बुधवारी कोरोनामुक्त - तीन

बुधवारी मृत्यू- शुन्य

उपचार सुरु- ५०

गंभीर रुग्ण - तीन

loading image
go to top