esakal | नांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

नांदेड २०२ रुग्ण कोरोना मुक्त, २१६ जण पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होतेय असे वाटत असताना बुधवारी (ता. २६) प्राप्त झालेल्या ७३७ अहवालापैकी ५१४ जण निगेटिव्ह तर २१६ जणांचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर २०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले व दिवसभरात पाच जाणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. त्यामुळे नांदेडकरांना दिलासा आणि धक्काही बसला आहे. 

बुधवारी (ता.२६) शासकीय रुग्णालयातील - सात, जिल्हा रुग्णालयातील - एक, पंजाब भवन कोविड सेंटरमधील - ४५, मुखेड- ३३, अर्धापूर- १४, लोहा- चार, नायगाव- २३, धर्माबाद- २८, देगलूर- २३, बिलोली- एक, माहूर- एक, उमरी- दहा, खासगी रुग्णालय- नऊ आणि औरंगाबाद येथे संदर्भित करण्यात आलेले - तीन असे २०२ कोरोना बाधित रुग्णांनी दहा दिवसानंतर कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत तीन हजार ७४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा- नांदेड जिल्ह्यात भोसी येथे पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु करणार-  पालकमंत्री अशोक चव्हाण​

पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू 

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय व एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या पाच बाधितांचा बुधवारी मृत्यू झाला. यात कंधार तालुक्यातील कुरुळा पुरुष (वय ६५), काबरानगर नांदेड पुरुष (वय ६६), हदगाव दोन पुरुष (वय ७९), कंधार पुरुष (वय ६२) व देगलूर येथील महिला (वय ५८) या पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवारपर्यंत १९७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

मंगळवारी (ता.२५) आरटीपीसीआर व ॲन्टीजेन किटद्वारे जिल्ह्यातील शेकडो संशयितांचे स्वॅब तपासणीकरिता घेण्यात आले होते. बुधवारी (ता.२६) यातील ७३७ जणांचा अहवाल प्राप्त झाला यामध्ये २१६ जण पॉझिटिव्ह आढळुन आल्याने जिल्हायातील एकूण बाधित रुग्णांची संख्या पाच हजार ४९२ वर इतकी झाली आहे. सध्या जिल्ह्यातील एक हजार ५१८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी १७४ बाधितांची प्रकृती नाजुक असल्याचे सांगितले जात आहे. 

हेही वाचा- नांदेडचा हा किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर, कोणता ते वाचा? ​

२१६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

बुधवारी बाधितांमध्ये नांदेड मनपा क्षेत्र - ६६, नांदेड ग्रामीण - आठ, देगलूर - सहा, किनवट - २३, मुखेड - २७, नायगाव - नऊ, अर्धापूर- दोन, लोहा- १४, कंधार- ११, बिलोली- तीन, हदगाव-११, धर्माबाद- १३, भोकर-एक, माहूर- एक, मुदखेड- आठ, परभणी-एक, लातूर-एक व हिंलोली सहा असे २१६ जणांचा अहवाल बाधित आला आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती 

सर्वेक्षण- एक लाख ५१ हजार २२२ 
घेतलेले स्वॅब- ३८ हजार ६५६ 
निगेटिव्ह स्वॅब- ३१ हजार ३८९ 
बुधवारी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- २१६ 
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- पाच हजार ४९२ 
बुधवारी स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- सात 
बुधवारी स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- शुन्य 
एकूण मृत्यू संख्या- १९७ 
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- तीन हजार ७४० 
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- एक हजार ५१८ 
बुधवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- २६५ 
बुधवारी रोजी गंभीर प्रकृती असलेले बाधित- १७४