नांदेड : सत्तावीस वर्षीय अविवाहितेवर अत्याचार करून खून, बिलोली शहरातील घटना 

विठ्ठल चंदनकर
Thursday, 10 December 2020

बिलोली शहरात घडलेल्या घटनेची माहिती अशी की, बिलोली शहरातील झोपडपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या कुडके परिवारातील मयत सुनिता नबाजी कुडके (वय २७)ही बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान जिल्हा परिषद हायस्कूलच्या पाठीमागे शौचालयासाठी गेली असता. आरोपीने तिच्यावर पाळत ठेवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

बिलोली (जिल्हा नांदेड) : आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या बिलोली शहरातील एका 27 वर्षीय अविवाहित तरुणीवर शारीरिक अत्याचार करुन तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करून आरोपींना तात्काळ ताब्यात घेण्याची मागणी केली. दरम्यान एलसीबीचे द्वारकादास चिखलीकर यांच्यासह नांदेडचे श्वान पथक बिलोलीत दाखल झाले आहे.

बिलोली शहरात घडलेल्या घटनेची माहिती अशी की, बिलोली शहरातील झोपडपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या कुडके परिवारातील मयत सुनिता नबाजी कुडके (वय २७) ही बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान जिल्हा परिषद हायस्कूलच्या पाठीमागे शौचालयासाठी गेली असता. आरोपीने तिच्यावर पाळत ठेवून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. उघडकीस येऊ नये म्हणून तिला दगडाने ठेचून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा खून केला. दरम्यान सायंकाळी सहाच्या दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर बिलोली शहरात संतापाचे व तणावाचे वातावरण तयार झाले.

हेही वाचा - नांदेड : शेतकर्‍यांना लाखोंचा गंडा घालणारा व्यापारी काचावार पसारच

आई वडिलांचे छत्र हरपलेल्या या अविवाहित मुलींना कोणाचेही पाठबळ नसल्यामुळे शहरातील अनेक प्रतिष्ठितांनी पुढाकार घेऊन मयत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी व आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांकडे आग्रह झाला. बिलोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान शहरातील तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन एलसीबीचे द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपींचा शोध तात्काळ लागावा यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले असून एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याघटनेचा छडा लागेपर्यंत ताब्यात न घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

बुधवारी रात्री उशिरा दयानंद विठ्ठल कुडके यांच्या फिर्यादीवरून बिलोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुरुवारी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे हे करीत आहेत.

लहानपणीच झाले पोरके.... दरम्यान नबाजी कुडके कुटुंबियांना साठेनगर मधील पुनर्वसनाच्या वेळी घर न मिळाल्यामुळे त्यांना झोपडपट्टी भागात वास्तव्य करावे लागले. मयत सुनीताला आणखी एक बहीण व भाऊ आहेत. हे तिघेही लहान असताना आई आणि वडील दोघेही त्यांना सोडून गेल्यामुळे ते पोरके झाले होते. मोठ्या बहिणीने सुनीताचा सांभाळ केला होता. भाऊ शेजारच्या तेलंगणामध्ये जाऊन उदरनिर्वाह करतो. त्यामुळे बिलोली शहरांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A 27-year-old unmarried man was brutally murdered in Biloli nanded news