नांदेड @३१ : आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, ‘सारी’चाही वाढला धोका   

शिवचरण वावळे
Sunday, 3 May 2020

एकीकडे रविवारी एकाचा मृत्यू तर दुसरीकडे पुन्हा नव्याने दोन ‘कोरोना’ रुग्णांची भर, ही नांदेडकरांमध्ये चिंतेची बाब ठरली आहे. उन्हाचा पारा वाढत असतानाच हळहळु ‘कोरोना’ रुग्णांचीही संख्या वाढतच चालली आहे. नांदेड जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधीत रुग्णांची संख्या आता ३१ वर जाऊन पोहचली आहे.  

 

नांदेड :  सहा दिवसांपासून नांदेड जिल्ह्याला ‘कोरोना’ रुग्णाचे धक्क्यावर धक्के बसत आहेत. शनिवारी (ता.तीन) सकाळी तीघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर दुपारी पुन्हा त्यात दोनची भर पडली. त्यामुळे आता ‘कोरोना’ बाधितांची संख्या ३१ झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.  

शुक्रवार (ता. एक मे) तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी तीन नमुने रविवारी (ता. तीन मे) Corona Positive आल्याने नांदेडकरांना धक्काच बसला. रविवारी सापडलेल्या कोरोना बाधितांपैकी दोन रुग्ण पंजाब येथून आलेले होते. तर एक महिला ही शहरातील एका खासगी रुग्णालयात ‘सारी’आजारावर उपचार घेत होती. त्यात पुन्हा दुपारी दोन कोरोना बाधितांची भर पडल्याने कोरोना बाधितांची संख्या ३१ वर पोहचली.    

हेही वाचा- Nanded Breaking : नांदेडमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह, रूग्ण संख्या २९, मृत्यू २

‘सारी’ आजारावर सुरु होते उपचार

रविवारी (ता.तीन मे) सकाळी तीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले. त्यामध्ये देगलुरनाका परीसरातील रहिमतनगर येथील ४८ वर्षीय महिलेचा समावेश होता. ही महिला शहरातील एका खासगी रुग्णालयात ‘सारी’ आजारावर उपचार घेत होती.  दरम्यान या महिलेला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिचा स्वॅब घेण्यात आला होता. रविवारी सकाळी तिला ‘कोरोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, दुपारी तिला पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाला. या महिलेचा शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.  

हेही वाचा- Nanded Breaking : ‘ती’ महिला सकाळी पाॅझीटीव्ह, दुपारी मृत्यू

दुपारपर्यंतची परिस्थिती

महापालिका हद्दीतल्या एक हजार १९९ संशयित व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले. त्यापैकी रविवारी दुपारपर्यंत एक हजार १२२ स्वॅबचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर २२ स्वॅबचा अहवाल अजूनही प्रंलंबित आहे. तर १८ संशयितांचे स्वॅबचे निष्कर्ष निघाला नाही. त्यामुळे एकुण घेण्यात आलेल्या एक हजार १९९ स्वॅब पैकी ३१ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded @ 31: The Report Of Two More Positives Increased The Risk Nanded News