Nanded Breaking : नांदेडमध्ये आणखी तीन पॉझिटिव्ह, रूग्ण संख्या २९, मृत्यू २

nanded news
nanded news

नांदेड : शुक्रवार (ता. एक मे) तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी तीन नमुने रविवारी (ता.तीन मे)  Corona Positive आले आहेत. त्यापैकी दोन रुग्ण पंजाब येथून आलेले असून, त्यांना शासकीय आयुर्वेद रूग्णालयात तर एक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती, जिल्हा शल्य चिकित्सक चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी दिली. त्यामुळे नांदेडमध्ये रुग्णांची संख्या आता २९ झाली असून यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाउनमध्ये अडकून पडलेल्या पंजाबच्या यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेले २३ चालक शुक्रवारी (ता. एक) में रोजी नांदेडमध्ये दाखल होताच त्यांना गावाच्या सीमेपलीकडे थांबवून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी रविवारी (ता.तीन) सकाळी प्राप्त रिपोर्टमध्ये दोन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.  

नांदेडहुन पंजाबला खुराणा ट्रॅव्हल्समार्फत २३ बस गेल्या होत्या, त्यात  (सचखंड मधुन १० तर त्यानंतर लंगरमधुन १३ असे एकुण २३ बस पाठवण्यात आल्या होत्या.  गाडीवरील २३ ड्रायव्हर नांदेड शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांना गावाबाहेर थांबून त्यांचे मेडिकल चेकअप करुन सर्व गाड्या निर्जंतुकीकरण करण्यात आल्या. तसेच या ड्रायव्हरांना विशेष रुग्णवाहिकेतद्वारे शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयमध्ये ठेण्यात ठेवून त्यांचा स्वॅब तपासणीसाठी ठेवण्यात आले होते.

२७ जणांवर उपचार सुरु 
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी (ता.एक) मे रोजी १२०३ संशयिताची नोंदणी करण्यात आली होती. यातील १०८८ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर १०३ जणांचे अहवाल नमुने तपासणीसाठी प्रलंबित होते. यामध्ये पंजाबवरून आलेल्या २३ यात्रेकरूंचाही समावेश आहे. रविवारी (ता.तीन) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात पुन्हा नव्याने तीन कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २९ वर पोहोचली आहे. दोन जणांचा मृत्यू झाल्याने सध्या जिल्ह्यात २७ जणांवर उपचार सुरु आहेत.  

यात्रेकरुंना सोडणे पडले महाग
यापूर्वीदेखील २८ एप्रिल रोजी पंजाबहून परतलेल्या दोन चालक व एका मदतनीसला करुणाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पंजाबच्या यात्रेकरूंना त्यांच्या घरी सोडणे नांदेडसाठी घातक तर ठरले नाही ना? अशी म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

आता घ्यावी लागणार खबरदारी
नांदेड शहरात रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आता अधिक खबरदारी घेण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी घरीच राहावे. सुरक्षित राहावे. बाहेर जाणे आवश्यक आहे का? याचा दहा वेळा विचार करूनच घराबाहेर पडावे आणि कोणाच्याही थेट संपर्कात न येता शारीरिक अंतर पाळावे. चेहऱ्यावर मास्क लावावा किंवा रूमाल अथवा गमछाने चेहरा झाकून ठेवावा. आपले हात वारंवार साबन व पाण्याने स्वच्छ धुवावे तसेच बाहेर पडल्यास सेनेटायझरचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com