नांदेड : चाभरा येथील 33 केव्ही उपकेंद्र तातडीने उभारावे- दत्ता पाटील पांगरीकर

र्धापूर तालुक्यात बागायती क्षेत्र असल्यामुळे कृषी विजपंपधारक शेतकरी जास्त आहेत. तसेच केळी, ऊस, भाजीपाला पिके, फळबागा जास्त असल्यामुळे अखंडीत विजपुरवठा करणे आवश्यक असते.
दत्ता पाटील पांगरीकर, अर्धापूर, नांदेड
दत्ता पाटील पांगरीकर, अर्धापूर, नांदेड

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : तालुक्यातील आठ गावांना सुरळीत व योग्य दाबाने विज पुरवठा होण्यासाठी चाभरा येथील 33 के.व्ही. उपकेंद्र तातडीने उभारावे अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता पाटील पांगरीकर यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. या उपकेंद्रासाठी जमीन खरेदी करण्यात आली आहे. या मागणीकडे लक्ष घालण्याचे आश्वासन श्री चव्हाण यांनी दिले आहे.

अर्धापूर तालुक्यात बागायती क्षेत्र आसल्यामुळे कृषी विजपंपधारक शेतकरी जास्त आहेत. तसेच केळी, ऊस, भाजीपाला पिके, फळबागा जास्त असल्यामुळे अखंडीत विजपुरवठा करणे आवश्यक असते. पण वाढत्या विजेच्या मागणीमुळे खंडीत व कमी दाबाने विज पुरवठा होतो. याचा परिणाम बागायती पिकांवर होवून शेतक-यांना आर्थिक फटका बसतो.

हेही वाचा - शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्‍ला; चाकूने भोसकून मारण्याचा प्रयत्न

तालुक्यातील चाभरा, पांगरी, कारवाडी, रोडगी, सोनाळा, खैरगाव, चाभरा तांडा आदी गावातील विज जोडीणी व कृषी पंपाला सुरळीत व योग्य दाबाने विज पुरवठा करण्यासाठी चाभरा येथील नियोजित 33 के. व्ही. उपकेंद्र तातडीने उभारण्यात यावे अशी या भागातील शेतकरी, नागरिकांची मागणी आहे.

चाभरा येथील नियोजित 33 के. व्ही. उपकेंद्रसाठी जागा खरेदी करण्यात आली आहे. तसेच सुमारे पाच कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.या भागातील शैलीसाठी हे केंद्र तातडीने उभारण्यात यावे यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे अशी माहिती दत्ता पाटील पांगरीकर यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com