दंगल प्रकरणी ३५ जणांना अटक | Nanded | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड : दंगल प्रकरणी ३५ जणांना अटक
दंगल प्रकरणी ३५ जणांना अटक

नांदेड : दंगल प्रकरणी ३५ जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम संघटनांकडून शुक्रवारी (ता.१२) भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. नांदेड शहरातही कडकडीत बंद पाळत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. याप्रकरणी जवळपासून ३०० जणांवर गुन्हे दाखल झाले असून, ३५ जणांना पोलिसांना आतापर्यंत ताब्यात घेतले आहे. त्रिपुरा येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरात देगलूर नाका भागात मुस्लम संघटनांनी मोर्चाचे आयोजन शुक्रवारी केले होते.

हेही वाचा: औरंगाबाद : कुकची प्रेयसीच्या घरात आत्महत्या

सभेनंतर काही नागरिकांच्या जमावाने शहरात दगडफेक करून चांगलीच दहशत निर्माण केली होती. तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवरही जमावाने दगडफेक करून जखमी केले. तसेच अनेक भागात सुरु असलेल्या दुकानांची तोडफोड करून मालाची नासधुस केली आहे. या दंगलीमुळे शहरातील देगलूरनाका, शिवाजीनगर, इतवारा, पावडेवाडी नाका, कलामंदीर आदी भागात शासकीय मालमत्तेसह खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. दरम्यान या दंगलीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या सुचनेवरून १० पथक स्थान करण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी ३५ आरोपींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये शिवाजीनगर पोलिस ठाणे सात, इतवारा १५, नांदेड ग्रामीण १० असे एकूण ३५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. इतरांचा अजूनही शोध सुरु आहे.

loading image
go to top