esakal | नांदेडला खासगी रुग्णालयात ३९९ रुग्णांवर उपचार सुरु, गुरुवारी २६४ जण पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी (ता. १७) एक हजार ७० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७५१ निगेटिव्ह तर २६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १२ हजार ७०१ वर जाऊन पोहचला आहे.

नांदेडला खासगी रुग्णालयात ३९९ रुग्णांवर उपचार सुरु, गुरुवारी २६४ जण पॉझिटिव्ह, आठ जणांचा मृत्यू 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - शहरातील शासकीय रुग्णालयातील कोरोना रुग्णांचे बेड संपल्यामुळे नाइलाजास्तव कोरोना बाधित रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. शहरासह विविध ठिकाणच्या खासगी रुग्णालयात ३९९ पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु असल्याची बाब गुरुवारी (ता. १७) प्राप्त झालेल्या आहवालातून स्पष्ट झाली आहे. 

बुधवारी (ता. १६) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वँब अहवालापैकी गुरुवारी (ता. १७) एक हजार ७० अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ७५१ निगेटिव्ह तर २६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा १२ हजार ७०१ वर जाऊन पोहचला आहे. दहा दिवसाच्या उपचारानंतर विष्णुपुरीच्या रुग्णालयातील एक, जिल्हा रुग्णालयातील आठ, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमध्ये असलेले ११०, किनवट पाच, भोकर एक, धर्माबाद दोन, हिमायतनगर १२, मुखेड २४, उमरी १४, हदगाव ११, कंधार एक, देगलूर १६, नायगाव २०, बिलोली १७ व खासगी रुग्णालयातील चार असे मिळुन २४६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत आठ हजार ४८० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

हेही वाचा- Video- मराठा समाजाने वकील लावावा, पैसे आम्ही देऊ : कोण म्हणाले? वाचाच

आतापर्यंत ३३८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या काही कमी होताना दिसत नाही. गुरुवारी दिवसभरात दत्तनगर नांदेड महिला (वय ६५), बालाजीनगर नांदेड पुरुष (वय ७२), विशालनगर नांदेड पुरुष (वय ६५), चौफाळा नांदेड पुरुष (वय ५५), करंजी (ता. माहूर) महिला (वय ६२), येताळा (ता.धर्माबाद) महिला (वय २०), मुदखेड महिला (वय ५५), शेलगाव (ता. अर्धापूर) पुरुष (वय ५०) या आठ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ३३८ रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यूची नोंद झाली आहे. 

हेही वाचले पाहिजे- तळहातावरचे पोट भरायचे कसे, वेठ बिगारी कामगाराचा संतप्त सवाल ​

एक हजार १२५ जणांचे स्वॅब अहवाल प्रतिक्षेत 

गुरुवारी प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर व अँन्टीजन टेस्ट किटद्वारे प्राप्त झालेल्या अहवालात जिल्ह्यासह इतर ठिकाणच्या व्यक्तीनं कोरोनाची लागण झाली असून, यात नांदेड महापालिका हद्दीत १२१, नांदेड ग्रामीण ११, लोहा आठ, हदगाव सहा, अर्धापूर १८, कंधार सहा, बिलोली १०, किनवट १२, मुखेड २४, हिमायतनगर एक, धर्माबाद १०, उमरी चार, मुदखेड सात, नायगाव आठ, भोकर नऊ, देगलूर एक, हिंगोली दोन, लातूर दोन, बीड एक, परभणी एक व यवतमाळ दोन असे २६४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १२ हजार ७०१ इतकी झाली असून, त्यापैकी आठ हजार ४८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या तीन हजार ८१८ बाधितावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ४२ जणांची प्रकृती गंभीर आहे. एक हजार १२५ जणांचे स्वॅब अहवाल प्रतिक्षेत आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - १२ हजार ७०१ 
आज पॉझिटिव्ह- २६४ 
एकुण कोरोनामुक्त - आठ हजार ४८० 
आज कोरोनामुक्त - २४६ 
एकुण मृत्यू-३३८ 
आज मृत्यू - आठ 
सध्या उपचार सुरु - तीन हजार ८१८ 
गंभीर रुग्ण - ४२ 
अहवाल प्रतिक्षेत - एक हजार १२५