नांदेड - दिवसभरात ४० कोरोना पॉझिटिव्हची भर, ३४ रुग्ण कोरोनामुक्त 

file Photo
file Photo
Updated on

नांदेड - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच बुधवारी संख्या वाढली आहे. बुधवारी (ता. १६) प्राप्त अहवालानुसार ४० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. दरम्यान, ३४ कोरोनाबाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. बारा रुग्णांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

आजच्या एक हजार २२६ अहवालापैकी एक हजार १८२ अहवाल निगेटिव्ह आले तर ४० अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २० हजार ९११ एवढी झाली आहे. त्यातील १९ हजार ८७२ बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. सध्या एकुण २८३ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १२ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ५६१ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 

घरी बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के 

बुधवारी बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी एक, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण १६, लोहा तालुक्यांतर्गत तीन, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल तीन, किनवट तीन, खासगी रुग्णालय आठ असे एकूण ३४ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात १४, मुदखेड तालुक्यात एक, मुखेड सहा, हिमायतनगर एक, धर्माबाद एक, नांदेड ग्रामीण एक, देगलूर चार, लोहा एक, नायगाव एक, परभणी एक असे एकुण ३१ बाधित आढळले. अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड महापालिका क्षेत्रात सात, लोहा तालुक्यात दोन असे एकुण नऊ बाधित आढळले. 

अशी आहे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती

जिल्ह्यात २८३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ३१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे २७, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नवीन इमारत येथे २०, मुखेड आठ, देगलूर दहा, हदगाव सहा, किनवट तीन, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरण १२४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण २६, हैदराबाद येथे संदर्भीत एक, औरंगाबाद येथे संदर्भित एक व खासगी रुग्णालयात २६ रुग्ण आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १६१ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ६८ एवढ्या खाटा उपलब्ध आहेत. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - २० हजार ९११ 
एकूण बरे - १९ हजार ८७२ 
एकुण मृत्यू - ६१ 
बुधवारी पॉझिटिव्ह - ४० 
बुधवारी कोरोनामुक्त - ३४ 
बुधवारी मृत्यू - शून्य 
आज प्रलंबित स्वॅब - ३६० 
रुग्णालयात उपचार सुरू - २८३ 
अतिगंभीर प्रकृती रुग्ण - १२ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com