नांदेड : लोहगाव येथे मोतिबिंदू शिबिरात आढळले ४८ रुग्ण: मानवता संस्थेचा उपक्रम

प्रल्हाद कांबळे
Friday, 29 January 2021

या रुग्णांवर ता. तीन फेब्रुवारीला मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.मानवता सेवाभावी संस्थेच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले.

नांदेड :  लोहगाव (ता. बिलोली) येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात दिडशे नागरीकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी मोतिबिंदूचे ४८ रुग्ण आढळून आले. या रुग्णांवर ता. तीन फेब्रुवारीला मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.मानवता सेवाभावी संस्थेच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोहगाव येथे मानवता सेवाभावी संस्था व लॉयन्स नेत्रालय नांदेड यांच्या वतीने आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात गावातील सुमारे दोनशे गरजू नागरिकांनी नोंदणी केली होती. यावेळी दीडशे रूग्ण तपासण्यात आले. त्यापैकी ४८ रूग्ण मोतिबिंदू असलेले आढळून आले. या रुग्णांवर ता. तीन फेब्रुवारीला नांदेडला लॉयन्स नेत्रालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

आपले गाव मोतिबिंदू मुक्त करुन वृध्द नागरीकांचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी अशा शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.दिलीप शिंदे यांनी दिली. आपल्या गावातील लोकांना विविध आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. गतवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित शिबिरात ३५ नागरिकांच्या मोतिबिंदूचे ऑपरेशन करण्यात आले होते.यासाठी लॉयन्स नेत्रालयाचे अध्यक्ष नित्यनंद मैय्या यांनी सहकार्य केले.

बुधवार (ता. २७) जानेवारी रोजी आयोजित शिबीरात प्रा. लक्ष्मण कोंडावार, बाळू जगडमवार, मुन्ना दासरवाड,चंद्रकांत उमरे, दीपक स्वामी, हनुमंत मिसाळे, शामसुंदर शिंदे, मल्लीकार्जून स्वामी, पांडूरंग लष्करे आदींनी परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: 48 patients found in cataract camp at Lohgaon: Humanitarian Initiative nanded news