नांदेड - शनिवारी ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; ४० जण कोरोनामुक्त

शिवचरण वावळे
Saturday, 23 January 2021

शनिवारी दिवसभरात श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - चार, महापालिकेतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण - १८, माहूर, एक, लोहा- एक, खिनवट - एक, देगलूर- दोन, कंधार- सहा व खासगी रुग्णालय - सात असे ४० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे.

नांदेड -मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसत असतानाच शनिवारी  (ता.२३) आलेल्या अहवालात ४० जण कोरोनामुक्त, ५५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता २२ हजार २५४ इतकी झाली आहे.

शनिवारी दिवसभरात श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - चार, महापालिकेतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण - १८, माहूर, एक, लोहा- एक, खिनवट - एक, देगलूर- दोन, कंधार- सहा व खासगी रुग्णालय - सात असे ४० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या २१ हजार १३९ इतकी झाली आहे. शनिवारी दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ५८२ वर स्थिर आहे.

हेही वाचा- पालकमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर एकाच व्यासपीठावर, अनेकांच्या भुवया उंचावल्या ​

सात कोरोना बाधितांची प्रकृती गंभीर

नांदेड वाघाळा महापालीकेंतर्गत ३६, नांदेड ग्रामीण - पाच, बिलोली- एक, हिमायतनगर - दोन, मुखेड - एक, कंधार- एक, उमरी- एक, हदगाव- दोन, लोहा- एक, किनवट - दोन आणि परभणी तीन असे ५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २२ हजार २५४ इतकी झाली आहे. सध्या ३३० बाधितावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी सात कोरोना बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

हेही वाचा- तरुणावर प्राणघातक हल्ला; नांदेडच्या बारडध्ये ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अशा पद्धतीने उपचार सुरु आहेत.

सध्या विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात - १६, जिल्हा रुग्णालय - १८, जिल्हा रुग्णालय (नवीन इमारत) - २०, महसूल कोविड सेंटर - १०, मुखेड - १४, महापालीकेंतर्गत गृहविलगीकरणात - १८५, किनवट - दोन, देगलूर - चार, नांदेड तालुक्यातील गृह विलगीकरणात ३८ व खासगी रुग्णालयात - २३ अशा पद्धतीने उपचार सुरु आहेत.

नांदेड कोरोना मीटर

एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- २२ हजार २५४
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २१ हजार १३९
एकूण मृत्यू संख्या-५८२
शनिवारी पॉझिटिव्ह - ५५
शनिवारी कोरोनामुक्त - ४०
शनिवारी मृत्यू - शुन्य
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ः ९४. ९८ टक्के
प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-३९६
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-३३०
अतिगंभीर प्रकृती असलेले- सात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: 55 reports positive on Saturday; 40 corona free Nanded News