esakal | नांदेड - ९३ टक्के कोरोनाबाधितांना दिलासा, गुरुवारी २३३ कोरोनामुक्त; ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गुरुवारी सायंकाळी एक हजार १७५ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार ५८ अहवाल निगेटिव्ह आले तर ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १८ हजार ४८७ रुग्ण संख्या झाली आहे.

नांदेड - ९३ टक्के कोरोनाबाधितांना दिलासा, गुरुवारी २३३ कोरोनामुक्त; ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. तसेच दुसरीकडे पॉझिटिव्ह रुग्ण आणि मृत्यूसंख्येत घट होत आहे. गुरुवारी (ता. २२) आलेल्या अहवालात २३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर नव्याने ९३ रुग्णांची भर पडली. दरम्यान, तीन कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

बुधवारी (ता. २१) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी गुरुवारी सायंकाळी एक हजार १७५ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये एक हजार ५८ अहवाल निगेटिव्ह आले तर ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १८ हजार ४८७ रुग्ण संख्या झाली आहे. गुरुवारी दिवसभरात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील शिवकल्याणनगर नांदेड पुरुष (वय ८५), सोमठाणा (ता. नायगाव) पुरुष (वय ६०) आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या पिंपळगाव (ता. नांदेड) येथील पुरुष (वय ४४) या तीन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ४९५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- नांदेड - उद्धट बँक अधिकाऱ्यांना संस्काराची गरज - खासदार हेमंत पाटील संतापले ​

एक हजार १२९ कोरोना बाधितांवर उपचार सुरु 

गुरुवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील पाच, जिल्हा शासकीय रुग्णालय - दहा, पंजाब भवन, यात्री निवास, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईनमधील १४९, मुखेड - एक, किनवट - चार, धर्माबाद - एक, उमरी - चार, बारड - दोन, कंधार - सहा, बिलोली - पाच, देगलूर - एक, लोहा - एक, हदगाव - चार आणि खासगी रुग्णालयातील ४० असे २३३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत १६ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार १२९ कोरोना बाधितांवर उपचार सुरु असून, त्यापैकी ४३ जणांची प्रकृती गंभीर आहे. 

हेही वाचले पाहिजे- कोरोना इफेक्ट - नांदेड एसटी विभागास दोन कोटी ९४ लाखाचा तोटा; लांब पल्ल्‍याच्या बस लवकरच सुरू होणार ​

या भागात आढळुन आले पाझिटिव्ह

गुरुवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात ५५, नांदेड ग्रामीण - पाच, अर्धापूर - चार, किनवट - चार, कंधार - तीन, मुदखेड - एक, हदगाव - एक, उमरी - दोन, लोहा - नऊ, भोकर - दोन, माहूर - तीन, यवतमाळ - दोन, परभणी - एक व हिंगोली - एक असे ९३ बाधित रुग्ण आढळुन आले. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण कोरोना पॉझिटिव्ह - १८ हजार ४८७ 
आज गुरूवारी पॉझिटिव्ह - ९३ 
एकुण कोरोनामुक्त - १६ हजार ७३६ 
आज गुरूवारी कोरोनामुक्त - २३३ 
आज गुरूवारी मृत्यू - तीन 
एकुण मृत्यू - ४९५ 
उपचार सुरु - एक हजार १२९ 
गंभीर रुग्ण - ४३ 
अहवाल प्रलंबित - २७८