
Software Engineer And Sister Die In Nanded Road Accident
Esakal
सॉफ्टवेअर इंजिनिअरसह त्याच्या बहिणीचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तरुणाचं लग्न ठरवण्यासाठी कुटुंबिय नांदेडहून चंद्रपूरला निघालं होतं. त्यावेळी नांदेड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. यात मनोज दिघोरे (देवरे) आणि त्याची बहीण मनीषा राचेवाड यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील इतर नातेवाईक जखमी झाले आहेत. हदगाव तालुक्यातल्या गोजेगाव इथं अपघात झाला.