नांदेड : अपघातात कंधारचे दोघे भाऊ ठार

उस्माननगर - कलंबर मार्गावर बुधवारी (ता. एक) मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना घडली.
road accident
road accidentroad accident

कंधार : दुचाकी अपघातात कंधार शहरातील दोन भावांचा मृत्यू झाला. उस्माननगर - कलंबर मार्गावर बुधवारी (ता. एक) मध्यरात्रीनंतर ही दुर्घटना घडली. कंधारच्या जवाहर गल्ली भागातील सय्यद जुबेर सय्यद रफिक (वय २०) व त्याचा भाऊ सय्यद शौकत सय्यद रफिक (१८) हे दुचाकीने जात होते. मध्यरात्रीनंत एकच्या सुमारास दुचाकीला अपघात झाल्याने दोघेही जागीच ठार झाले.

सहायक पोलिस निरीक्षक देवकत्ते यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी अपघातानंतर दुचाकीने पेट घेतल्याचे, काही अंतरावर ट्रक उभा असल्याचे दिसले. दुचाकी सुमारे दोनशे मीटरपर्यंत फरपटत गेल्याचे पोलिसांनी सांगितले. ट्रकने दुचाकीला धडक दिली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com