नांदेड - कृषीमंत्री दादा भूसे यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील शेतीची पाहणी, नुकसानीचे पंचनामे करुन राज्य- केंद्र सरकारला अहवाल पाठविणार

शिवचरण वावळे
Sunday, 27 September 2020

कृषीमंत्री श्री.भुसे रविवारी (ता. २७) हिंगोली जिल्ह्याचा दौरा आटोपून लातूरकडे जाण्यापूर्वी नांदेडकडे येत असताना जागोजागी थांबून त्यांनी  शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेंड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची उपस्थिती होती.

नांदेड - नांदेड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे यांनी रविवारी (ता.२७) नांदेड तालुक्यातील मालेगाव, कासारखेडा व पासदगाव शिवारात भेट दिली. पासदगाव येथील गंगाधर शेषेराव जाधव या शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची त्यांनी पाहणी केली. 

कृषीमंत्री श्री.भुसे रविवारी (ता. २७) हिंगोली जिल्ह्याचा दौरा आटोपून लातूरकडे जाण्यापूर्वी नांदेडकडे येत असताना जागोजागी थांबून त्यांनी  शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या वेळी त्यांच्यासोबत हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, नांदेंड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, विभागीय कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, उपविभागीय कृषी अधिकारी रविकुमार सुखदेव, नांदेड तालुका कृषी अधिकारी सिद्धेश्वर मोकले, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले यांची उपस्थिती होती.

हेही वाचा- नांदेडची हळद निघाली बांगलादेशात; शेतकरी उत्पादक कंपनीचा पुढाकार ​

शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करुन भरपाइ द्यावी 

नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी दौऱ्यात त्यांनी मालेगाव, कासारखेडा व पासदगाव येथे शिवारात भेट दिली. नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या समस्यादेखील जाणून घेतल्या. शेतकऱ्यांनी सरसकट पंचनामे करुन भरपाइ द्यावी, अशा मागणीचे निवेदन कृषी मंत्री दादा भुसे यांना दिले.

आठवडाभरात पंचनामे करण्याचे निर्देश 

दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करण्यासाठी तिजोरीत पैसा नाही ही वस्तुस्थिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितली. राज्यात मागील काही दिवसांत अतिवृष्टी झाल्याने पावसाने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे आठवडाभरात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असले, तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती असल्याचे कबूल करत पैसे उभा करु, असेही भुसे म्हणाले. त्यामुळे पुढचे तीन महिने तरी शेतकऱ्यांना शासनाकडून कुठलीही मदत मिळणार नाही. हे स्पष्ट झाले आहे. 

हेही वाचा- नांदेड - लॉकडाउननंतर ‘कोरोना’चा खासगी ‘डोस’ सोसेना ​

नुकसान भरपाई तत्काळ मिळणे शक्य नाही

सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना तत्काळ मदत करता येईल अशी परिस्थिती नाही. शासनाच्या तिजोरीत सध्या पैसा नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे भुसे म्हणाले. मात्र शेतकऱ्यांना मदतीसाठी वाटेल ते करु पण शेतकऱ्याला मदत करु, असही ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ मिळणे शक्य नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: Agriculture Minister Dada Bhuse will inspect the agriculture in Nanded district and send a report to the state and central government Nanded News