नांदेड - लॉकडाउननंतर ‘कोरोना’चा खासगी ‘डोस’ सोसेना 

File Photo
File Photo

नांदेड - जिल्ह्यात सुरुवातीस कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोजकी होती. त्यामुळे शहरातील चार ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात. परिणामी नागरीकांच्या खिशाला चिमटा बसत नव्हता. मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत गेली आणि शहरात शासकीय रुग्णालये फुल्ल झाल्याने खासगी कोविड केअर सेंटरच्या जिवघेण्या शुल्कामुळे सर्वसामान्य कोरोना रुग्णांना खासगी रुग्णालयाचा फीसचा डंखा सोसवेनासा झाला आहे. 

जिल्ह्यातील विविध कोरोना सेंटर व शासकीय रुग्णालयात मिळून सध्या तीन हजार ५१९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात साडेतीनशे ते चारशे बेड, जिल्हा रुग्णालयात २०० बेड, नवीन इमारतीमध्ये- ५० ते शंभर खाटा, आणि शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात ५० खाटा ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवार (ता. २५) च्या आकडेवारीनुसार विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात २७०, जिल्हा रुग्णालय- ८३, जिल्हा रुग्णालय नवीन इमारतीमध्ये ४५ आणि शासकीय आयुर्वेदिक रुग्णालयात केवळ - ३६ यासह एनआरआय-पंजाब भवन- महसूल भवन व होम आयसोलेशन सेंटर असे मिळुन एक हजार ७७६ असे दोन हजार २१० रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर विविध खासगी रुग्णालयात ३१४ रुग्ण दाखल झाले आहेत. 

रुग्णालयात किमान एक लाख रुपयापर्यंत फीस 

खासगी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच किमान एक लाख रुपयापर्यंत फीस भरावी लागत आहे. तर दिवसाला चार ते सात हजार रुपये इतका खर्च येत असून, मेडीकलचा खर्च वेगळा करावा लागत आहे. शिवाय विविध चाचण्यांसाठी दहा ते १२ हजार रुपये असा खर्च होत आहे. शहरातील काही खासगी कोविड सेंटरमध्ये तर दहा दिवसाचे पॅकज ठरवून दिले जात आहे. त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार केला जात आहे. 

रुग्णालयातील बेडची स्थितीची रोजनिशी माहिती दिली जावी

शहरातील शासकीय रुग्णालयात खाटा शिल्लक असताना ऐपत नसणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना देखील खासगी कोविड सेंटरमध्ये का दाखल व्हावे लागत आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कोरोना आहवालासोबत जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील बेडची स्थिती याबद्दल रोज संध्याकाळी माहिती दिली जावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी रुग्णालयाच्या खाटांच्या स्थितीवर दक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com