
गौरव वाळिंबे
नांदेड : अतिवृष्टीच्या तडाख्याने आधीच त्रस्त असलेल्या नांदेडकरांवर आता हवाई सेवाही बंद पडल्याचा मोठा धक्का बसला आहे. श्री गुरू गोविंदसिंगजी विमानतळावरील धावपट्टीवर खड्डे पडल्याने विमानसेवा शुक्रवारी (ता.२२) रात्रीपासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.