नांदेड : शेतकऱ्यांना मदतीसाठी पाठपुरावा करणार; अशोक चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Ardhapur Heavy rains farmers Kharif crops damage

नांदेड : शेतकऱ्यांना मदतीसाठी पाठपुरावा करणार; अशोक चव्हाण

अर्धापूर - अर्धापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून, शेती खरडून गेली आहे. सखल भागातील घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांना व नागरिकांना जास्त जास्त मदत देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच रस्ते, नाली, मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे कामे, पिक विमा, विज वितरण कंपनी, आदी विभागाच्या प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी गुरूवारी बैठक घेण्यात येणार आहे. अशी माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी दिली.

त्यांनी अर्धापूर तालुक्यातील मालेगाव, सावरगाव, कामठा, गणपूर, सांगवी, खडकी, मेंढला, शाहपूर, लोणी खूर्द, लोणी बुद्रुक आदी गावांना भेटी देऊन, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली, शेतकरी, नागरिकांनी संवाद साधून आस्थेने चौकशी करून प्रशासनाला तात्काळ मदत देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे अशी ग्वाही दिली.

त्यांच्या सोबत माजी खासदार तुकारामजी रेंगे पाटील, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, पप्पु पाटील कोंढेकर तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाणे, आनंद भंडारे, केशवराव इंगोले, तहसीलदार उज्वला पांगरकर गटविकास अधिकारी मिना रातयतळे, तालुका कृषी अधिकारी अनिल शिरफुले, बांधकाम विभागाचे उपअभियंता विशाल चोपडे, उपकार्यकारी अभियंता अविनाश रामगिरवार आदी अधिकारी होते.

Web Title: Nanded Ardhapur Heavy Rains Farmers Kharif Crops Damaged Ashok Chavan Review

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..