नांदेड : सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे आयोजन

प्रल्हाद कांबळे
Saturday, 5 December 2020

कोवीड-19 चा प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम साध्यापणाने होणार असून या कार्यक्रमास आमंत्रित  कार्यालय प्रमुख, माजी सैनिक संघटना अध्यक्ष व विरनारी, विरमाता, विरपिता यांनीच उपस्थित रहावे, असे आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.  

नांदेड :सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2020  संकलन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 7 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे  करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोवीड-19 चा प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम साध्यापणाने होणार असून या कार्यक्रमास आमंत्रित  कार्यालय प्रमुख, माजी सैनिक संघटना अध्यक्ष व विरनारी, विरमाता, विरपिता यांनीच उपस्थित रहावे, असे आवाहन परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी तथा नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.  

 

सन 2019- 20 मध्ये नांदेड जिल्ह्याला संकलनाचे उद्दीष्ट 35 लाख 30 हजार रुपये इतके देण्यात  आले होते. ते जिल्ह्याचे 124 प्रतिशत पुर्ण करुन 43 लाखा 82 हजार रुपये एवढा निधी शासनास जमा केला आहे. या कार्याची दखल घेत शासनाने नांदेड जिल्हयास उत्कृष्ट निधी संकलनासाठीचे स्मृतीचिन्ह प्रदान  केले आहे. 

 

सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2019 साठी उत्कृष्ट संकलन करणाऱ्या जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुख कर्मचाऱ्यांसह संस्था तसेच दानशूर व्यक्तींना या कार्यक्रमात प्रशस्तीपत्रके व पुस्तक स्वरुप भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे औचित्यसाधून जिल्हयातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता व विशेष गौरव पुरस्कार प्राप्त पाल्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Armed Forces Flag Day fundraising event nanded news