Nanded: भाऊरावने एफआरपीची सर्व रक्कम चुकती केली : अशोक चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण

भाऊरावने एफआरपीची सर्व रक्कम चुकती केली : अशोक चव्हाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : साखरेला चांगला भाव मिळत असल्याने एफआरपीची सर्व रक्कम चुकती केली आहे. कामगारांना दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात बाजारात जर साखरेला चांगला राहिला तर साखरेचे उत्पादन करण्यात येईल, जर इथेनॉलला भाव जास्त मिळाला तर इथेनॉलचे उत्पादन करण्याचे धोरण ठरविण्यात येईल, यंदाच्या हंगामात साडे आठ लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखाना प्रशासनाने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासुन कारखाना चालविला आहे.

कारखान्याला राजकारणाचा अड्डा होवु दिला नाही. कै. शंकरराव चव्हाण यांच्या पुन्याईने हा कारखाना उभा राहिला असून यापुढे ही चालू राहिल. असे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.१५) भाऊरावच्या अग्नीप्रदिपन सोहळ्यात सांगितले.

हेही वाचा: Video : धोनीची चूक जड्डूनं भरुन काढली; मॅच इथंच फिरली!

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना समुहाच्या येळेगाव येथील युनिट एकचा २६ वा अग्नीप्रदिपन सोहळा उत्साहात संपन्न झाला. कारखान्याचे संस्थापक अध्य‌‌क्ष पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते होम हवन पूजा झाल्यावर एक छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी आमदार अमिता चव्हाण, भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके, उपाध्यक्ष प्रा. कैलास दाड, गुलाबराव भोयर, नरेंद्र चव्हाण, श्रीजया, चव्हाण सुजया चव्हाण, संचालक रंगराव पाटील इंगोले, व्यंकटराव कल्याणकर, मोतीराम पाटील, रामदास कदम, दत्ता सुर्यवंशी, सुभाष कल्याणकर, साहेबराव राठोड, सुभाषराव देशमुख, आनंद सावते, दत्तराव आवातिक, पप्पू पाटील कोंढेकर, बालाजी गव्हाने, श्यामराव पाटील, मारोतराव गव्हाने आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी शिवाजीराव धर्माधिकारी यांनी केले, तर प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष प्रा. कैलास दाड यांनी आभार मानले. या वेळी आनंदराव कपाटे, डॉ. उत्तमराव इंगळे, संजय लोणे, आनंदराव क्षिरसागर, केशवराव इंगोले, सरपंच अमोल डोंगरे, भगवान तिडके, गजानन कदम, व्यंकटराव साखरे, प्रल्हाद सोळंके, सोनाजी सरोदे, चंद्रमुनी लोणे, गोरखनाथ राऊत, संजय गोवंदे, बालाजी कदम, यशवंत राजेगोरे, राजु कल्याणकर, दत्ता नादरे, राजु पवार, गोविंद गोदरे, राजू गायकवाड आदी उपस्थित होते.

loading image
go to top