Nanded: अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत महापौरांनी स्वीकारला पदभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत महापौरांनी स्वीकारला पदभार

नांदेड : अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत महापौरांनी स्वीकारला पदभार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नूतन महापौर जयश्री निलेश पावडे यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थीतीत दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर शुक्रवारी (ता. १५) महापौरपदाचा पदभार स्विकारला. महापौरपदी त्यांची बुधवारी (ता. १३) बिनविरोध निवड झाली होती.

महापौरपदी निवड झाल्यानंतर महापालिकेत अधिकारी, पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी त्यांनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पदभार स्विकारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार दसऱ्याच्या मुहुर्तावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे नांदेड वाघाळा महापालिकेत स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर महापौर कक्षात त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी उपस्थितांनीही त्यांचे स्वागत केले.

हेही वाचा: Video : धोनीची चूक जड्डूनं भरुन काढली; मॅच इथंच फिरली!

यावेळी यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, माजी महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूद खान, सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, अब्दुल सत्तार, श्याम दरक, किशोर स्वामी, आनंद चव्हाण, नरसिंगराव पावडे, निळकंठराव पावडे, सतिश देशमुख तरोडेकर, अमितसिंह तेहरा, विजय येवनकर, किशोर भवरे, संतोष मुळे, कविता मुळे आदी उपस्थित होते.

loading image
go to top