esakal | नांदेड : वाहतूक नियमांचे पालन करुन आपघात टाळा- महामार्गचे अरुण केंद्रे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आपल्या व आपल्या कुटुंबीयांसाठी वाहतूकीचे सर्व नियम पाळून वाहने चालवणे आवश्यक आहे, असे मत वसमत फाटा महामार्ग पोलिस सुरक्षा पथकाचे निरीक्षक अरुण केंद्रे यांनी मंगळवारी ( ता. १६ ) केले.

नांदेड : वाहतूक नियमांचे पालन करुन आपघात टाळा- महामार्गचे अरुण केंद्रे

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : अपघातामुळे कुटुंबाला अनेक संकटाला सामोरे जावे लागते. तसेच जिवीत, आर्थिक नुकसान होते. अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे, हेल्मेट, शिट बेल्टचा वापर करणे आवश्यक आहे. मद्यपान करुन वाहन चालवणे अत्यंत धोकादायक आहे. आपल्या व आपल्या कुटुंबीयांसाठी वाहतूकीचे सर्व नियम पाळून वाहने चालवणे आवश्यक आहे, असे मत वसमत फाटा महामार्ग पोलिस सुरक्षा पथकाचे निरीक्षक अरुण केंद्रे यांनी मंगळवारी ( ता. १६ ) केले.

वसमतफाटा महामार्ग पोलिस पथकाचे पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे यांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी हालवून मदत केल्याने जखमीचा जीव वाचविण्यासाठी मदत केली होती. त्यांच्या कार्याची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे.

श्रीनिवास देशमुख यांच्या मित्रमंडळाच्या वतीने सत्कार

पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे यांच्या कार्याची दखल घेवून सोनखेड गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास देशमुख यांच्या मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर, जिल्हा काॅग्रेसचे सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, तालुकाअध्यक्ष बालाजी गव्हाने, पंडित लंगडे, बाळू पाटील, रंगनाथ इंगोले,शंकर ढगे, सरपंच दत्ता नादरे आदी उपस्थित होते.

वाहन अपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत

यावेळी बोलतांना अरुण केंद्रे म्हणले की, वाहनअपघातांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अपघात टाळणे आपल्या हाती आहे. महामार्ग कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील अपघात प्रवन क्षेत्राचे सर्वेक्षण करणे, सुचना फलक लावने, वाहनचालकांने प्रबोधन करणे आदी उपकृम राबविण्यात येत आहेत. तसेच अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेतून ७५ हजाराची मदत शासनाच्या वतीने अपघातग्रस्तांना देण्यात येते अशी माहिती अरुण केंद्रे यांनी दिली.

संपादन- प्रल्हाद कांबळे