नांदेडला दररोज हजारावर स्वॅब अहवाल प्रतिक्षेत, गुरुवारी २२२ कोरोनामुक्त; १९५ जण पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे
Thursday, 1 October 2020

गुरुवारी संध्याकाळपर्यंत अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असताना देखील संध्याकाळी केवळ ८२८ प्राप्त झाले. त्यापैकी ६२६ निगेटिव्ह तर १९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर २२२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी पुन्हा एक हजार २५९ जणांचे स्वॅब अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. 

नांदेड - मराठवाड्यात औरंगाबाद आणि लातूरनंतर नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली आहे. तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तत्काळ प्राप्त व्हावा, यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन कोरोना चाचणी लॅब मंजुर करुन घेतल्या. मात्र असे असताना देखील दररोज एक हजारापेक्षा अधिक स्वॅब अहवाल प्रलंबित राहत आहेत. 

बुधवारी (ता. ३०) तपासणीसाठी एक हजार ८० स्वॅब अहवाल घेण्यात आले होते. त्याचा गुरुवारी संध्याकाळपर्यंत अहवाल प्राप्त होणे अपेक्षित असताना देखील संध्याकाळी केवळ ८२८ प्राप्त झाले. त्यापैकी ६२६ निगेटिव्ह तर १९५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. तर २२२ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गुरुवारी पुन्हा एक हजार २५९ जणांचे स्वॅब अहवाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. 

हेही वाचा- नांदेडमधील उड्डाणपुलाचे काम ‘एमएसआरडीसी’च्या बजेटमधून होणार ​

आतापर्यंत ४०६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू  

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात अशा कोरोना चाचणीसाठी दोन लॅब उभारण्यात आल्या आहेत. दोन्ही लॅबचे काम दोन शिफ्टमध्ये सुरु असताना देखील आदल्या दिवशी घेतलेल्या स्वॅब अहवालासाठी तीन दिवसापर्यंत वाट बघावी लागत आहे. गुरुवारी (ता. एक) जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५ हजार ९०१ झाली आहे. दुसरीकडे दिवसभरात जिल्हा रुग्णालयातील नांदेडच्या शिवाजीनगरमधील पुरुष (वय ७५) व विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील मोहमंदनगर भोकर पुरुष (वय ७२), सराफा मुखेड पुरुष (वय ५५) या तीन पुरुषांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ४०६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : ग्रामसेवकाने केला साडेचार लाखाचा अपहार, चौकशीची मागणी

गुरुवारी एक हजार २५९ अहवाल प्रलंबित 

नांदेड महापालिका क्षेत्रात ७९, नांदेड ग्रामीण तीन, अर्धापूरला दहा, भोकरला दोन, कंधारला १२, हिमायतनगर दोन, किनवट एक, बिलोली दहा, हदगाव तीन, धर्माबाद आठ, देगलूर तीन, मुखेड ३०, लोहा तीन, नायगाव आठ, माहूर चार, मुदखेड आठ, उमरी दोन, हिंगोली एक, ठाणे एक, परभणी दोन, बासर एक, पुणे एक व लातूर एक असे १९५ बाधित आढळुन आले. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील १५, शासकीय रुग्णालय नऊ, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन व होम क्वॉरंनटाईनमधील ८५, बिलोली पाच, हदगाव तीन, मुखेड ३३, लोहा तीन, धर्माबाद चार, किनवट १०, अर्धापूर सात, मुदखेड आठ, उमरी दहा, नायगाव सहा आणि खासगी रुग्णालयातील १७ असे २२२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत १२ हजार १७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या तीन हजार २६४ रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ५४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. गुरुवारी एक हजार २५९ स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. 

नांदेड कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह संख्या - १५ हजार ९०१ 
आज गुरूवारी पॉझिटिव्ह - १९५ 
एकुण कोरोनामुक्त - १२ हजार १७५ 
आज गुरूवारी कोरोनामुक्त - २२२ 
एकुण मृत्यू - ४०६ 
आज गुरूवारी मृत्यू - तीन 
सध्या उपचार सुरु - तीन हजार २६४ 
गंभीर रुग्ण - ५४ 
प्रलंबित स्वॅब - एक हजार २५९ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded awaits thousands of swab reports every day Thursday 222 coronal free; 195 positive Nanded News