esakal | नांदेड : माहूर, उमरी येथे भाजपाने केली वाढीव विज बिलाची होळी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

आधीच कुटुंब,प्रपंच चालविने कठीन झाले असताना वाढीव विजबिल भरावे कुठुन असा गंभीर प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. भारतीय जनता पक्षाने या वाढीव विजबिल राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माफ करावे याकरिता राज्यात आंदोलन सुरु केले आहे.

नांदेड : माहूर, उमरी येथे भाजपाने केली वाढीव विज बिलाची होळी

sakal_logo
By
बालाजी कोंडे- प्रल्हाद हिवराळे

माहूर - उमरी (जिल्हा नांदेड) :  कोरोना महामारीमुळे लॉक डाऊन काळात नागरिकांना वाढीव विज बिल देण्यात आली. ती विज बिले माफ करावे अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येऊन वाढीव विज बिलांची होळी माहूर  तहसिल कार्यालया समोर सोमवारी(ता.२३) करण्यात आली. कोरोना मुळे सर्व व्यवहार ठप्प होते, अनेकांचे रोजगार गेले, नागरिक आर्थीक संकटात सापडले असताना लॉक डाऊन काळातील वाढीव विजबील विज वितरण कंपणीने देऊन नागरिकांना धक्का दिला.

आधीच कुटुंब,प्रपंच चालविने कठीन झाले असताना वाढीव विजबिल भरावे कुठुन असा गंभीर प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. भारतीय जनता पक्षाने या वाढीव विजबिल राज्यातील महाविकास आघाडी सरकारने माफ करावे याकरिता राज्यात आंदोलन सुरु केले आहे.

सोमवारी(ता.२३) सकाळी माहूर तहसिल कार्यालयासमोर माहूर भाजपाच्या वतीने वाढीव विजबिल विरोधात आंदोलन करण्यात येऊन वाढीव विज बिलाची होळी करण्यात आली. सदरिल आंदोलन भाजपाचे नेते योगी श्याम भारती महाराज,अॅड.रमन जायभाये,सुमीत राठोड, धरमसिंग राठोड, जेष्ठ नेते विजय आमले, अनिल वाघमारे, माजी तालुका अध्यक्ष देवकुमार पाटील, तालुका अध्यक्ष दिनेश येऊतकर, ज्योतीराम राठोड,सरपंच निळकंठ मस्के, विनोद सुर्यवंशी,नगरसेवक गोपु महामुने,संजय पेंदोर, प्रकाश पाटील भुसारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. नायब तहसिलदार व्ही.टी. गोविंदवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - नांदेड : एकाची आत्महत्या तर दुसऱ्याचा तोल गेल्याने पाण्यात बुडून मृत्यू. धर्माबाद तालुक्यातील घटना -

उमरीतील तळेगाव येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केली विजबिलाची होळी 

उमरी - महाविकास आघाडी सरकारने विज बिले वाढीव देऊन शेतक-यासह सर्वसामान्य जनतेची  मनमानीने दिशाभूल करून विजेच्या बिल वाढवून सर्व ‌सामान्य नागरिकांवर लादत आहे. विज बिले ज्यांनी भरत नाही त्यांचे विज कनेक्शन तोडल्या जात आहे. एकीकडे हाताला काम नाही. शेती पिकली नाही. त्यामुळे या निष्क्रिय सरकारच्या विरोधात माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीजबिलाच्या होळीचे तीव्र आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. आणि त्या आवाहनाला प्रतिसाद देत सोमवारी (ता. २३) उमरी तालुक्यातील तळेगाव येथील भारतीय जनता पार्टी तळेगाव शाखेच्या वतीने कार्यकर्त्यांनी विजबिलाची होळी केली. यावेळीदादाराव पाटील जाधव, दत्ता जाधव, व्यंकटेश मनोलवार, पांडुरंग जाधव, मारोती नाटकर, बालाजी शिगळे, आनंदा गणगोपलवाड, दत्ता नाटकर, साहेबराव नाटकर, साहेबराव जाधव, मोहन मेटेवाड, परसराम नाटकर, गोविंद गणगोपलवाड आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक विज बिलाची होळी करताना उपस्थित होते.

loading image