नांदेड : रक्तपेढ्यांच्या गोरखधंद्यावर अंकुश बसणार, नियम डावलल्यास होणार कारवाई

प्रल्हाद कांबळे
Thursday, 3 December 2020

रक्तपेढ्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी विविध निवेदनाद्वारे शासनास प्राप्त होत आहे. या मिर्णयामुळे रक्तपेढ्यांचा गोरखधंद्यावर अंकुश बसणार आहे. 

नांदेड : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना बगल देऊन रक्तपेढ्याने अवाजवी दर आकारणी केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत निर्णय घेऊन तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहे. रक्तपेढ्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी विविध निवेदनाद्वारे शासनास प्राप्त होत आहे. या मिर्णयामुळे रक्तपेढ्यांचा गोरखधंद्यावर अंकुश बसणार आहे. 

यात त्यात थॅलॅसिमिया रुग्णांना रक्त न देणे, त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्क घेणे, दररोजचा साठा दर्शनी ठिकाणी लावणे, रक्त पिशवीसाठी विहीत रकमेपेक्षा अवाजवी रक्कम आकारणी अशा तक्रारींचा समावेश आहे. सद्यस्थितीमध्ये राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या नियमावलीमध्ये रक्तपेढ्या वर दंडात्मक कारवाई करण्याबाबत कोणतीही तरतूद नाही अथवा संबंधित सक्षम अधिकाऱ्यास तसे अधिकारी नाहीत.

हेही वाचा -  खासदार हेमंत पाटील यांनी इशारा देताच विमा कंपनीचे कार्यालय तालुकास्तरावर सुरु -

परंतु राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या तीन नोव्हेंबर 2018 रोजी पार पडलेल्या एकोणचाळीसाव्या नियम बैठकीत मार्गदर्शक तत्वांचे व सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या रक्तपेढ्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. कारवाई करण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने संचालक राज्य रक्तसंक्रमण यांना सक्षम प्राधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहे. दोषाचे स्वरूप आणि आकारावयाची दंडात्मक रक्कम यांचा तपशीलही शासनाने निश्चित करुन दिला आहे.

ज्यादा रक्कम आकारलेल्या रक्तपेढीस पाचपट दंडाची तरतूद केली आहे. ज्यादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येईल व उर्वरित रक्कम राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. त्याला थॅलेसिमिया, हिमोफिलिया आणि सिकलसेल रुग्णांकडे ओळखपत्र असतानाही प्रक्रिया शुल्क आकारल्यास तीन पट दंड आकारण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Blood banks will be curbed, action will be taken if rules are broken nanded news