
सन २०१९ च्या हंगामातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर करून घेतला होता परंतू २०२० च्या हंगामात पीकविमा भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागले होते ,
नांदेड : चालू हंगामातील खरीपाचा पीकविमा तात्काळ मंजूर करून तालुका स्तरावर पीकविमा कंपनीचे कार्यालय सुरु करण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईलने कारवाई करू अशा इशारा खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना देताच यंत्रणा कामाला लागून हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यात विमा कंपनीचे कार्यालय सुरु करून ,प्रतिनिधी नेमणूक करण्यात आली आहे.
सन २०१९ च्या हंगामातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीकविमा खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर करून घेतला होता परंतू २०२० च्या हंगामात पीकविमा भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागले होते , याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्या कडे अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर अखेर जिल्ह्यातील कृषी अधिकारी आणि पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून शेतकऱ्यांचा चालू हंगामातील पीकविमा तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तालुकास्तरावर पीकविमा कंपनीचे कार्यालय सुरु करून त्याठिकाणी मदतीसाठी प्रतिनिधी नेमण्यात अन्यथा शिवसेना स्टाईलने करावी करण्यात येईल अशा इशारा दिला होता .
या इशाऱ्याची कृषी आणि पीकविमा कंपनीने गांभीर्याने दाखल घेतली असून जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा योजना सन २०२०-२१ ते २०२३ पर्यंत एचडीएफसी कंपनीच्या मार्फ़त राबवून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि सर्व तालुका कृषी अधिकारी यांच्या कायालयामार्फत योजनेची प्रसिद्धी आणि प्रचार करण्यासाठी सुरवात केली आहे . याच माध्यमातून हिंगोली जिल्ह्यात हिंगोली , कळमनुरी, औंढा (ना. ) सेनगांव, वसमत या तालुक्यात कृषी कार्यालयाबरोबरच पीकविमा कंपनीचे कार्यालय कार्यालय सुरु करण्यात आले असून शेतकरी बांधवांच्या अडीअडचणीसाठी पूर्णवेळ प्रतिनिधीची नेमणूकी करण्यात आली आहे . यामध्ये खरिपातील सोयाबीन, कापूस,तूर,मूग,उडीद,ज्वारी,आणि रब्बी हंगामातील हरभरा ,गहू,भुईमूग,ज्वारी पिकांचा समावेश असून जिल्हयातील शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यात संबंधित कार्यालयाशी अडीअडचणीच्या निवारणासाठी संपर्क साधावा असे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे .
शेतकरी हिताच्या दृष्टीने खासदार हेमंत पाटील यांनी आजवर पीकविमा मंजुरी, हळद संशोधन बोर्ड, नुकसान भरपाईची मंजुरी, शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा, शेत मालाच्या साठवणुकीसाठी ५० हजार मेट्रिक टनांच्या गोदामची मंजूरी हे कार्य केले आहेत. खासदार हेमंत पाटील यांच्या कामाचे मतदारसंघातून स्वागत करून शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त केला जात आहे .