नांदेड : तुंबरपल्लीत धाडसी चोरी, ९२ हजारासह सोन्याचे दागिने पळविले

उमाकांत पंचगल्ले
Sunday, 22 November 2020

पोलीस ठाणे मरखेल येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे अधिक तपास पोलीस ठाणे मरखेल चे स.पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर व सहकारी मोहन कणकवले पि.पी इंगोले राजेंद्र वाघमारे हे करीत आहेत

हानेगाव (जिल्हा नांदेड) - येथून जवळच असलेल्या  तुंबरपळी (ता. देगलूर) येथे अज्ञात चोरट्यांनी घरातील एक लाख १६ हजार लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की मौजे तुंबरपल्ली येथील राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या रामराव हुल्लप्पा राकवीकर यांच्या घरात शनिवार ता. २१ रोजी पहाटे साडेतीन च्या सुमारास तिघा अज्ञात चोरट्यांनी घरात जाऊन सोयाबीन विक्री करून  कपाटात ठेवलेले ९२ हजार रोख रक्कम व आठ ग्राम सोन्याचे दागिने असे एकूण एक लाख सोळा हजाराचे ऐवज पळवून नेत असताना फिर्यादी रामराव रावीकर यांना जाग आल्याने कोण आहे अशी विचारणा करत असताना चोरट्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे.

हेही वाचा -  नांदेड :ग्रंथालयांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाचकांना सेवा पुरवावी- सुनील हुसे

सदरील घटनेत लगतच असलेल्या खतगाव फाटा येथील मोटार सायकल वाहन क्रमांक एम एच १२ एस एल ४१६२चोरी करून वाहन घटनास्थळीच फेकून पसार झाले कर्नाटकातील हंगरगा येथील दोन ठिकाणी घरफोडी करून ५००० रुपये पळविल्याची माहिती मिळाल्याने सदरील चोरटे कर्नाटकातून आल्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे मरखेल येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे अधिक तपास पोलीस ठाणे मरखेल चे स.पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर व सहकारी मोहन कणकवले पी. पी. इंगोले राजेंद्र वाघमारे हे करीत आहेत.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Brave theft in Tumbarpalli, gold jewelery along with Rs 92 thousand stolen nanded news