esakal | Nanded Breaking : शनिवारी दिवसभरात सात पॉझिटिव्ह ; संख्या ४५ वर
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

गेल्या दिड महिण्यापासून शहरात ‘कोरोना’ बाधीत रुग्ण आढळुन येत होते. परंतु शनिवारी पहिल्यांदाच माहूर तालुक्यातील एका ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने ग्रामिण भागातील नागरीकांनमध्ये चिंतेचे वातावरण बनले आहे. त्यामुळे हळुहळु कोरोना ग्रामिण भागाकडे पाय पसरत असल्याचे दिसून येते. माहूरच्या या कोरोना बाधीत रुग्णावर तालुक्यातीस कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. सर्व कोरोना बाधीत रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.

Nanded Breaking : शनिवारी दिवसभरात सात पॉझिटिव्ह ; संख्या ४५ वर

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : नांदेड शहरात शनिवारी (ता.नऊ) सकाळी नगिनाघाट परिसरातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर संध्याकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा नव्याने पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले असून, एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ४५ झाली असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे, अशई माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

होळीला जम्मू कश्मीर येथून नांदेडला गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या मात्र, दीड महिन्यापासून येथेच अडकुन पडलेल्या दोन यात्रेकरूंना ‘कोरोना’ची बाधा झाल्याचे शनिवारी (ता. नऊ) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून समोर आले. शनिवारी सायंकाळी सात वाजता दुसरा अहवाल आला यात शहरातील तीन रुग्ण यात दोन १४ वर्षीय मुलांचा समावेश असून, एका ३२ वर्षीय महिलेचा तर माहूर तालुक्यातील एका ६४ वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शहरात सापडलेले तीन्ही रुग्ण हे देगलुरनाका रहेमतनगरातील मृत्यू पावलेल्या कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ४४ वर पोहचली होती.

परंतु, रात्री उशीरा पुन्हा तिसरा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात करबला भागातील ६१ वर्षीय रुग्ण कोरोना बाधीत झाला आहे. हा रुग्ण शुक्रवारी (ता.आठ) डाॅ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल झआला होता. दरम्यान शनिवारी (ता.नऊ) पहाटे साडेचारच्या सुमारास त्याचे निधन झाले होते. त्याचा थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असता त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याचे डाॅ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले आहे.   

हेही वाचा- Video : बारदाना गोडाऊनला आग ; लाखोंचे नुकसान

स्वॅब घेण्याची तिव्र मोहिम सुरु

नगिनाघाट परिसरातील ६३ जणांचे स्वॅब शुक्रवारी (ता.आठ) तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी ५४ जणांचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला असून, दोघेजण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यामध्ये ५५ व ५७ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. यातील ४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर तीन जणांचे अहवाल अनिर्णित आहेत. नगिनाघाट व आसपासच्या परिसरातून आतापर्यंत शंभरहून अधिक व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले असून या परिसरात थांबलेले जवळपास ३० जण आतापर्यंत कोरोना बाधीत झाले आहेत. यामुळे प्रशासनाकडून या परिसरात बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वब घेण्याची मोहिम अधिक तिव्र प्रमाणात सुरू केली आहे.

-आत्तापर्यंत एकूण बाधित -४५
- आतापर्यंत मृत्यू - पाच
-नमुने तपासणी अहवाल बाकी- ९८
- शनिवारी सहा नवीन बाधितांची भर