esakal | नांदेड : बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ पोलिस कोठडीत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास घडली होती. 

नांदेड : बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ पोलिस कोठडीत

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : दुसऱ्यासोबत बोलत असल्याच्या कारणावरुन सख्ख्या बहिणीचा चाकूने वार करुन खून करणाऱ्या आरोपी भावास नांदेड ग्रामिण पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९) सायंकाळच्या सुमारास घडली होती. 

नांदेड शहरापासून पाच किलोमिटर अंतरावर असलेल्या जवाहरनगर तुप्पा येथील रहिवासी असलेल्या एका २३ वर्षीय विवाहितेच्या सख्ख्या भावाने बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकून खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला होता. आरोपी भाऊ विठ्ठल रामराव झुंजारे (वय २०) याने त्याची बहीण दुसऱ्यासोबत बोलते व अनैतिक संबंधाच्या संशयावरुन तिच्याच घरात घुसून ता. २९ जानेवारी रोजी चाकूने भोसकून खून केला.

शिताफीने शोध लावून पोलिसांनी जेरबंद केले

सदर आरोपीचा शिताफीने शोध लावून पोलिसांनी जेरबंद केले. याप्रकरणी मयत विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र सांगळे करत आहेत.

loading image