esakal | नांदेड : शहापूर येथे धाडशी घरफोडी, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

 श्वानपथक ठसे तज्ज्ञांना पाचारण; कंधारच्या डीवायएसपीनी दिली शहापूरला भेट

नांदेड : शहापूर येथे धाडशी घरफोडी, साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

sakal_logo
By
अनिल कदम

देगलूर (जिल्हा नांदेड) : शहापूर येथे शनिवारी (ता. १२) रात्री चोरट्यांनी घरफोडी करुन अडीच लाख रुपये नगदी व पाच तोळे सोन्याचे दागिणे लंपास केले. या प्रकरणी देगलुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. 

मुंबई महानगर पालिकेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेल्या एका कर्मचाऱ्याचे मुळगाव शहापूर असून त्यांचे येथे निवासस्थान आहे. शनिवार (ता. १२) रोजीच्या मध्यरात्री त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी नगदी दोन लाख पन्नास हजार रुपये व पाच तोळे सोने लंपास केल्याची घटना रविवारी (ता. १३) रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा बिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू

शहापूर येथील व मुंबई महानगर पालिकेमध्ये कर्मचारी असलेले नागोराव मलकु गाडगे, गंगाराम मलकु गाडगे या दोन सख्ख्या भावाचे निवासस्थान आहे. ते येथे राहात नसल्याने त्यांना घराच्या पाहणीकरता एका चौकीदाराचीही नेमणूक केली होती. रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी नागोराव गाडगे यांच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडून कपाटात ठेवलेले दोन लाख पन्नास हजार रुपये नगदी व पाच तोळे सोने लंपास केले. 
    
या प्रकरणाची फिर्याद चौकीदार गोपाळ दत्तू श्रीरामवार यांनी दिली. देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळाला कंधारचे डीवायएसपी किशोर कांबळे, पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान धबडगे हे करीत आहेत. 

loading image