नांदेड : विदेशी दारूसह टेम्पो जळून खाक, कशामुळे लागली आग वाचा... 

प्रल्हाद कांबळे
Monday, 7 September 2020

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे पायोनियर मद्य उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीतील विदेशी दारु (मॅकडॉल) घेऊन टेम्पो (एमएस०९९८१) मधून २९ लाखाची दारु मुंबईला घेऊन निघाला.

नांदेड : जिल्ह्यातील धर्माबाद येथून विदेशी दारु घेऊन निघालेल्या टेम्पोला आग लागली. या आगीत ३९ लाखाची विदेशी दार व पाच लाखाचा टेम्पो असा ३४ लाखाचा ऐवज जळून खाक झाला. ही घटना हंगरगा (ता. मुखेड) येथे रविवारी (ता. सहा) घडली. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे पायोनियर मद्य उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीतील विदेशी दारु (मॅकडॉल) घेऊन टेम्पो (एमएस०९९८१) मधून २९ लाखाची दारु मुंबईला घेऊन निघाला. मात्र टेम्पो चालक हा मुखेड तालुक्यातील हंगरगा येथील राहणारा असल्याने त्याने आपण याच मार्गावर असल्याने एक मुक्काम घरी करु असे ठरवून तो टेम्पोसह हंगरागा येते पोहचला. टेम्पो आपल्या अंगणात उभा करुन तो आपल्या घरच्या मंडळीसोबत रमला. मात्र शनिवारी (ता. पाच) रात्री शॉर्टसर्कीटमुळे उभ्या टेम्पोला आग लागली. 

हेही वाचा -  वाचाल तर वाचाल : हा संदेश तर देत नसेल ना ही महिला -

चालक आई- वडिलांची भेट घ्यावी या उद्देशाने तो हंगरगा येथे आला होता

टेम्पोत अल्कोहलयुक्त मद्य असल्याने आगीचा भडका उडाला. पहाता- पहाता सर्व दारुसह टम्पो असा ३४ लाखाचा ऐवज जळू खाक झाला. गावकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. हा प्रकार ता. सहा सप्टेंबर रोजी पहाटे दोनच्या दरम्यान उघडकीस आला. मुखेड तालुक्यातील हंगरगा येथील रहिवासी असल्याने आई- वडिलांची भेट घ्यावी या उद्देशाने तो हंगरगा येथे आला होता. अग्नीशमन दलाच्या बंबानाही पाचारण करण्यात आले होते. आग आटोक्यात येईपर्यंत विदेशी दारू वर टेम्पो जळून खाक झाला. टेम्पो चालक सदाशिव वारे यांच्या माहितीवरुन मुखेड पोलीस ठाण्यात जळीतप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Burn the tempo with foreign liquor, read the reason for the fire nanded news