esakal | नांदेड : कापणी करुन ठेवलेल्या सोयाबीनचे तीन ढिग जळुन खाक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शेतक-याच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावल्याने आधीच दुष्काळात सापलेल्या शेतक-यावर मोठे संकट कोसळले आहे. 

नांदेड : कापणी करुन ठेवलेल्या सोयाबीनचे तीन ढिग जळुन खाक

sakal_logo
By
विठ्ठल लिंगपूजे

शिवणी (ता. किनवट) : किनवट तालुक्यातील शिवणी येथिल शेतकरी हनमंतु बोंदरवाड यांच्या शेतातील सात एकरमधील काढणीसाठी कापणी करुन ठेवलेले सोयाबिनचे ढीग गुरुवारी (ता. २९) रात्री आठ वाजेच्या सुमारास जळुन खाक झाल्याने शेतकऱ्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. शेतक-याच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावल्याने आधीच दुष्काळात सापलेल्या शेतक-यावर मोठे संकट कोसळले आहे. 

कोरोना, दुबार पेरणी व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबर मोडल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाले. उरले सुरले सोयाबीन काढून बी -बियाण्याची तरी भरती होईल ह्या उद्देशाने सोयाबीन कापून ढीग लावल्याने अचानक या ढिगाला आग लागल्याने शेतकरी हनुमंतु बोंदरवाड यांनी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी महसूल विभागाला विनंती अर्ज केला आहे.

आर्थीक मदत मिळावी
 
किनवट तालुक्यातील शिवणी शिवारात सोयाबीनच्या तीन गंजीला आग लागल्याने शेतकर्‍यांचे एक लाख १४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवार रात्रीला अज्ञाताने आग लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शिवणी सज्जा शेत सर्वे नं ३६७ व ३६८ शिवारातील असलेल्या सात एकर शेतातील सोयाबीनची सोंगणी करून हणमंतु बोंदरवाड यांनी तीन ढीग लावून ठेवला होता. अज्ञाताने या सोयाबीनच्या तीन्ही ढिगाला आग लावली. त्यामुळे संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले. त्यांनी यासंदर्भात महसुल विभागाला काळवल्याने महसुल विभागाचे मंडळ अधिकारी एन. बी. सानप यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ऐन दिवाळीसमोर अशी दुर्देवी घटना घडल्याने शेतकरी हणमंतु बोंदरवाड यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न समोर आला असून संबंधित विभागाकडून शासकीय मदत मिळावी अशी मागणी केली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image