नांदेड : एमएचटी- सीईटी परिक्षेला जाण्या- येण्यासाठी उमेदवारांसाठी बसेसची सोय

file photo
file photo

नांदेड : एमएचटी- सीईटी 2020 या परीक्षा कालावधीत परिक्षार्थी उमेदवारांच्या मागणी व आवश्यकतेनुसार नांदेड विभागातील प्रत्येक आगारातून अतिरिक्त बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नांदेड बसस्थानकावरुन परिक्षा केंद्राच्या ठिकाणी परिक्षार्थी उमेदवार व पालकांना जाण्या- येण्यासाठी बसेस उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परिक्षार्थी उमेदवारांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत येणार असून सर्व आगार व्यवस्थापकांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य परिवहन नांदेडचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी शासकिय शासन अनुदानित व खाजगी विनाअनुदानीत महाविद्यालयाच्या अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र व कृषी तंत्रज्ञान विभागातील प्रथम वर्षे पदवी अभ्यासक्रमाचे सामाईक प्रवेश परिक्षेद्वारे (एमएचटी- सीईटी-2020) राज्य सामाईक प्रवेश परिक्षा ता. 1 ते 20 ऑक्टोंबर 2020 (ता. 3, 10, 11, 17 व 18 ऑक्टोंबर 2020 वगळून) या कालावधीत दोन सत्रामध्ये प्रथम सत्र 7.30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तर व्दितीय सत्र दुपारी 12.30 ते सायं 6. 45 पर्यंत नांदेड जिल्हयात 11 विविध केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यातून विद्यार्थी व पालक येणार असून त्यांना या परिक्षा केंद्राच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी कोव्हिड-19 सर्व नियमांचे व सामाजिक अंतराचे पालन करुन राज्य परिवहनच्या बसेस उपलब्ध करुन परिक्षार्थी उमेदवारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले होते.

विद्यापीठ परिसरातील सहा परिक्षा केंद्रासाठी बसेसची संख्या सहा

विद्यापीठ परिसरातील सहा परिक्षा केंद्रासाठी बसेसची संख्या 6 असून बसेस सोडण्याची वेळ प्रथम सत्रासाठी सकाळी 6 वा. तर द्वितीय सत्रासाठी सकाळी 11 वा. राहील. परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे आहेत. 1) आयऑन डिजीटल झोन, आयडीझेड विष्णुपुरी सहयोग कॅम्पस नांदेड 2) हॉरिझॉन इंटरनॅशनल सीबीएसई स्कुल विष्णुपुरी नांदेड 3) एसएसएस इंदिरा इन्स्टीटयुट ऑफ टेकनॉलॉजी पॉलीटेकनिक विष्णुपुरी नांदेड 4) श्री गुरुगोविंद सिंघजी इन्स्टीटयुट इंजिनिअरींग अॅन्ड टेकनॉलॉजी विष्णुपुरी नांदेड 5) ग्रामिण कॉलेज ऑफ इंजिनिअरींग विष्णुपुरी नांदेड 6) मातोश्री प्रतिष्ठान ग्रूप ऑफ इन्स्टीटयुट जिजाऊनगर खुपसरवाडी नांदेड. तर 7) कलावतीबाई कॉलेज ऑफ इंजि. अॅन्ड टेक.पॉली, लालवाडीरोड नायगाव बाजारसाठी बसेसची संख्या 2 असून प्रथमसत्रासाठी सकाळी 5 वा. व द्वितीय सत्रासाठी वेळ सकाळी 10 वाजता बसेसची वेळ राहील.

या शाळांवरील परिक्षा केंद्रासाठी

8) किड्स किंगडम इन्टरनॅशनल स्कुल, खुरगाव मालेगाव रोड नांदेड बसेसची 9) गोकुळधाम इन्टरनॅशनल स्कुल ऑनलाईन एक्झाम सेन्टर, भालकी व्हिलेज, मालेगाव रोड नांदेड केंद्रासाठी बस संख्या 2 असून प्रथमसत्रासाठी बसची वेळ सकाळी 6 वा. तर द्वितीय सत्रासाठी सकाळी 11 वाजता राहील. 10) महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कॉलेज नांदेड विमानतळाजवळ नांदेड 11) महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स अॅन्ड इन्फारमेंशन टेकनॉलॉजी, विमानतळाजवळ हिंगोली रोड नांदेड या परीक्षा केंद्रांसाठी बसेची संख्या 2 असून प्रथम सत्रासाठी सकाळी 6.30 वा. तर द्वितीय सत्रासाठी वेळ सकाळी 10.30 वाजता राहील. उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी या बसेस उपलब्ध राहतील, असे राज्य परिवहन नांदेडचे विभाग नियंत्रण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.                  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com