नांदेड : दामिनी पथकाकडून गांजा जप्तीची कामगिरी, ग्रामीणचे गुन्हे शोध पथक तोंडघशी

प्रल्हाद कांबळे
Saturday, 19 December 2020

ग्रामीण पोलिसांना व विशेष करुन गुन्हे शोध पथकाला चपराक देत इतवारा उपविभागांतर्गत चालणाऱ्या दामिनी पथकाने धडक कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्याला अटक केली.  त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा गांजा जप्त केला. ही कारवाई फौजदार राणी भोंडवे यांच्या पथकाने शुक्रवार (ता. १८) डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली.

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना ऊत आला असून या हद्दीत वाळू, मटका, गुटखा, जुगार व स्वस्त धान्याचा काळाबाजार होत असतो. या सर्व अवैध धंद्याकडे नांदेड ग्रामीण पोलिस दुर्लक्ष करत असल्याने या धंदेवाल्यांचे गोरखधंदे सुरुच आहेत. ग्रामीण पोलिसांना व विशेष करुन गुन्हे शोध पथकाला चपराक देत इतवारा उपविभागांतर्गत चालणाऱ्या दामिनी पथकाने धडक कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्याला अटक केली.  त्याच्याकडून पाच हजार रुपयांचा गांजा जप्त केला. ही कारवाई फौजदार राणी भोंडवे यांच्या पथकाने शुक्रवार (ता. १८) डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, इतवारा उपविभागात नेमणुकीस असलेल्या दामिनी पथकप्रमुख फौजदार राणी भोंडवे ह्या आपले सहकारी कर्मचारी राजेश माने, महिला पोलिस श्रीमती दिग्रसकर आणि चालक श्री. गवळी यांना सोबत घेऊन हस्सापुर ते मोदी ग्राउंड रस्त्या दरम्यान शउक्रवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास गस्त घालत होत्या. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन त्यांनी गांजा विक्री करणाऱ्या माधव बालाजी उबाळे (वय ३६) राहणार क्रांतीनगर, असर्जन (तालुका नांदेड) याला ताब्यात घेतले.

हेही वाचानांदेड : रासायनिक खताच्या दरवाढीमुळे उकिरड्याचे फिटले पांग, शेणखताची मागणी वाढली! -

फौजदार राणी भोंडवे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा

श्री उबाळे याच्याकडून जवळपास पाच हजार रुपयाचा सव्वा किलो गांजा जप्त केला. ही कारवाई नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे आणि पोलिस निरीक्षक प्रशांत देशपांडे यांना माहिती दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. माहिती मिळताच श्री देशपांडे यांनी आपले गुन्हे शोध पथक व त्यांच्यासोबत सरकारी साक्षीदारांसह घटनास्थळी पाठविले. फौजदार शेख असद यांनी सरकारी पंचासमक्ष माधव उबाळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गांजा जप्त करुन पंचनामा केला. त्यानंतर मुद्देमालासह आरोपीला पोलिस ठाण्यात हजरलकेले. फौजदार राणी भोंडवे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे २० (ब) प्रामाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शेख जावेद करत आहेत. 

येथे क्लिक करानांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना कामातील कामचुकारपणा भोवणार -

राणी भोंडवे यांनी यापूर्वीही जबरी चोरी करणारा आरोपी केला होता अटक

महिला पोलिस अधिकाऱ्यांनी गांजासारख्या गंभीर अवैध धंद्यावर कारवाई केल्याने गुन्हे शोध पथकाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी फौजदार राणी भोंडवे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Cannabis confiscation from Damini squad, Grameen Crime Investigation Squad nanded news