नांदेड : चोर म्हणून पकडले, मात्र निघाले शिकारी, टोळी सक्रीय

प्रकाश जैन
Friday, 11 September 2020

वडगांव ज. शिवारात हरणाची शिकार करुण मांस घेवून जाणार्‍या तिघांना  गांवकर्यानी पकडले.

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील वडगांव ज. शिवारात हरणाची शिकार करून दुचाकीवरून हरणाचे मांस नेत असताना वडगांव तांडा येथील जागरुक तरुणांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हि घटना  गुरुवारी (ता. 9 ) राञी दरम्यान घडली. 

तालुक्यातील वडगांव ज. शिवारात रिठा तांडा ता. किनवट येथील 1दादाराव गणू राठोड 2बळीराम सुभाष राठोड.  3 भीमराव बळीराम आडे. हे तीघे जन  हरणाची शिकार करून मांस विक्री करण्याचा धंदा करीत होते. सद्यस्थितीत सर्वञ चोर्याचे प्रमाण वाढल्याने गांवोगांवी तरुण राञीची गस्त घालत आहेत. ता. 9 च्या राञी रिठ्ठा तांडा येथील हे वरील तिघे  वडगांव शिवारात शिकारीसाठी आले होते. दोन हरणाची शिकार करून हरणाचे मांस व दोन मुंडके असा मुद्देमाल दुचाकी तेलंगणा पासिंगच्या गाडीवर नेत असताना वडगांव येथिल तरुणांना राञीची गस्त घालत असताना आढळून आले.

हेही वाचा नांदेडला रुग्णांचा आकडा दहा हजार पार, ६५ टक्के बाधित रुग्ण बरे; गुरुवारी ३२७ पॉझिटिव्ह

चोर समजून पनिशमेन्ट देण्याचा प्रयत्न केला

तरुणांनी सुरुवातीला चोर समजून पनिशमेन्ट देण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांनी हरणाची शिकार केल्याची कबुली दिली. हि माहिती त्या जागरूक तरुणांनी हिमायतनगर पोलीस ठाणे व संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्याना दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप इंगळे हे दाखल होवून आरोपीस दाब्यात घेतले.

आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात

वनपरिक्षेञ अधिकारी संध्याताई डोके, वनपाल गोरलावार, कोलते हे सकाळी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला. तीन  आरोपीस जेरबंद करुण त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर आरोपीस न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात येणार असल्याने अनेक गंभीर गुन्हे   तपासाअंती उघडकीस येण्याची शक्यता  वनप्रेमी नागरीकांतून वर्तवली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Caught as a thief, but went hunting, gang active