नांदेडला रुग्णांचा आकडा दहा हजार पार, ६५ टक्के बाधित रुग्ण बरे; गुरुवारी ३२७ पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे
Thursday, 10 September 2020

आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांपैकी ६५ टक्यापेक्षा अधिक रुग्ण उपचारातून बरे होत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. बुधवारी (ता. नऊ) घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी (ता. दहा) एक हजार ३३४ अहवाल मिळाले. त्यातील ९४९ निगेटिव्ह तर ३२७ अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात तिघांचा मृत्यू तर १२१ रुग्णांची कोरोनावर मात केली

नांदेड - कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांमध्ये कोरोनाची अगदी सौम्य लक्षणे आढळुन येत आहेत. अशा रुग्णांना दहा दिवसापर्यंत विलगीकरण कक्षात ठेवून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत कोरोना बाधित रुग्णांपैकी ६५ टक्यापेक्षा अधिक रुग्ण उपचारातून बरे होत असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. बुधवारी (ता. नऊ) घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी गुरुवारी (ता. दहा) एक हजार ३३४ अहवाल मिळाले. त्यातील ९४९ निगेटिव्ह तर ३२७ अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात तिघांचा मृत्यू तर १२१ रुग्णांची कोरोनावर मात केली आहे. 

वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे शहरातील एकही शासकीय तसेच खासगी रुग्णालयात एकही बेड रिकामे नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना बाधित रुग्ण ठेवण्यासाठी जागेची शोधाशोध सुरु आहे. बुधवारी आरटीपीसीआर व ॲन्टीजन टेस्ट किटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या तपासणीत ३२७ कोरोना बाधितांची भर पडल्याने बुधवारपर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या दहा हजार ३१३ इतकी झाली आहे. दत्तनगर नांदेड पुरुष (वय ६४), नगिनाघाट नांदेड महिला (वय ६०), शेकापूर कंधार पुरुष (वय ६५) या तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत २८३ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- आरेच्च नांदेडात पुरुष नसबंदीचा आकडा शोधून सापडेना, महिलांनाच घ्यावा लागतो नसबंदीसाठीही पुढाकार​

गुरुवारी श्री गुरु गोविंदसिंघजी स्ममारक शासकीय रुग्णालयातील चार, विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील १६, पंजाब भवन कोविड सेंटरमधील ३९, मुखेडचे आठ, देगलूरचे चार, कंधारचे दोन, धर्माबादचे चार, नायगावचे पाच, बिलोलीचे १३, मुदखेडचे सहा, किनवटचे दोन, हदगावचे ११, अर्धापूरचे तीन, लोहा कोविड केंद्रातून चार असे १२१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत सहा हजार ४८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा- गंभीर - रामघाटावर अंत्यविधीला नांदेडकरांची ‘या’ कारणासाठी होतेय अडवणूक ​

४१२ संशयितांचा स्वॅब अहवाल येणे बाकी​

आज गुरूवारी आढळून आलेल्या रुग्णांपैकी नांदेड महापालिका हद्दीत ८९, नांदेड ग्रामीणचे पाच, भोकर - चार, माहूर - चार, हिमायतनगर- दोन, किनवट - ३८, बिलोली - आठ, लोहा - २६, अर्धापूर - एक, नायगाव - १६, मुखेड - ५३, धर्माबाद - १३, कंधार - १२, उमरी - ११, हदगाव - १४, मुदखेड - २१, परभणी - पाच, उस्मानाबाद - एक, हिंगोली - चार असे ३२७ जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या तीन हजार ४८५ रुग्णावर उपचार सुरु असून, त्यापैकी ५३ रुग्ण अतिगंभीर अवस्थेत आहेत. ४१२ संशयितांचा स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. 

नांदेड कोरोना मीटर 

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - दहा हजार ३१३ 
गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्ण - ३२७ 
गुरुवारी उपचारानंतर बरे रुग्ण - १२१ 
गुरुवारी मृत्यू - तीन 
एकुण उपचारानंतर घरी गेलेले रुग्ण - सहा हजार ४८४ 
एकुण मृत्यू - २८३ 
सध्या उपचार सुरु - तीन हजार ४८५ 
अतिगंभीर रुग्ण - ५३ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of patients in Nanded has crossed ten thousand 65% of infected patients recover; Thursday 327 positive Nanded News