esakal | नांदेड : स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेची कारणीभूत घटक, वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

स्पर्धामुळे  आपल अस्तित्व टिकवण्यासाठी जी चढाओढ, मानसिक संघर्ष करावा लागतो आहे त्याचा परिणाम समाजात आणि पर्यायाने कुटुंबावर तसाच कुटुंबातील स्त्रीयांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे.

नांदेड : स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेची कारणीभूत घटक, वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : औद्योगिकरण आणि शिक्षण या गोष्टीमुळे जगातील मानवी जीवन सुखकर आणि सुलभ ज्याप्रमाणात झाले त्याच प्रमाणात देखील व्यक्तीच्या जीवन जगण्याच्या पध्दतीत देखील अमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. स्पर्धामुळे  आपल अस्तित्व टिकवण्यासाठी जी चढाओढ, मानसिक संघर्ष करावा लागतो आहे त्याचा परिणाम समाजात आणि पर्यायाने कुटुंबावर तसाच कुटुंबातील स्त्रीयांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. यामुळे हिंसाचार जसा मूर्त स्वरुपात वाढतोय तसाच तो अमूर्तस्वरुपात देखील अक्राळविक्राळ पध्दतीने मानवी जीवनपध्दतीवर परिणाम करित असल्याचे जाणवत आहे. 

भारतीय कुटुंबव्यवस्थेत मध्यकाळापासून स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले आहे. आजही कुटूंबव्यवस्था पितृसत्ताक पध्दतीने चालत असल्याने घरातील कर्त्या स्त्रीला आई, पत्नी, बहिण या प्रमाणे नातेसंबधात दुय्यम स्थान असल्याने कमजोर अथवा कमकुवत समजण्याच्या मानसिक विचारातून हिंसा घडताना दिसते.

हिंसेचे प्रकार

           शरिरिक हिंसा/अत्याचार.

  •  मानसिक हिंसा/अत्याचार.
  •  समाजमाध्यमातून होणारी हिंसा. 

हे प्रमुख तीन घटक स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेचे मानता येतील. 

स्त्रियांवर होणाऱ्या हिंसेची कारणीभूत घटक

1. पितृसत्ताक कुंटूब पध्दती अथवा समाजव्यवस्था.

2. संपत्तीचे अधिकार पुरुषांकडे.

3. शिक्षणाचे व प्रशिक्षणाचे परावलंबित्व.

4. मानसिक जडण-घडण यात स्त्री आणि पुरूष ह्या दोघींचीही कारणीभूत आहे.

5. स्पर्धा ही सर्व बाबतीत असलेलं एक महत्वपूर्ण घटक आहे 

6. शारिरीक कमकुवतपणाचा फायदा घेत, अत्याचार केला जातो

7. समाजाचे चौकटीतील वागण हे विविध बंधन आणि क्लेशकारक गोष्टी ला खतपाणी घालते

8. घराण, पत, प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रवृत्त करणारे विचार. हे आनासये पर्यायाने महिलांवर अनेक बंधन आणि याच्या नावाखाली जे नाही ते सहन करावे लागते.

9. आर्थिक स्वातंत्र्याच्या आड येणारे बंधन. बऱ्याचदा शेती किंवा घर, तसेच स्थावर मालमत्तेचे अधिकार महिलेला मिळालेलं असेल तर ते हस्तगत करण्यासाठी, आर्थिक परावलंबित्व सिध्द करण्यासाठी आणि कोणताही आधार शिल्लक राहू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार अश्या महिलाना सहन करावे लागतात, तर कधी कधी यात जीव देखील घेतला जातो.

10. पुरुषांची व्यसनाधिनता. घरात दारु पिउन आलेला नवरा हा नेहमी नशेत बायकोला महरहान करतो, हे प्रमाण कमी उत्पन्न गट आणि उच्च कुटूंबात देखील दिसते, हक्काचे राग काढण्याची व्यक्ति म्हणजे बायको असं हा अत्याचारच समीकरण बनले आहे.

11. कर्जबाजारीपणा. जर एखाद्या घरात कर्जबाजारी पणा असेल तर  ते पैसे परत करण्यासाठी घरातील महिला च्या माहेरवरून पैसेही मागितले जातात आणि ते जर नाही आणले तर तिच्यावर मारहाण देखील होताना दिसते.

12. वंशाचा दिवा म्हणून वारस मुलाचा अट्टहास. ही बाब पूर्वी समाजात खूप होती,जर  महिला ले मुलं किंवा अपत्य हे घराण्याचा वारस म्हणून जर मुलगा होत नसेल तर सर्व दोष त्या महिलेचा आहे असं मानुन घरात छळ होते होता, आता ही हे प्रमाण आहेच

13. लैंगिक सुखाची एकतर्फी मागणी तसेच एकतर्फी प्रेम. एकतर्फी प्रेम यामधून जर मुलीने किंवा महिलेने जर नकार दिला तर ती पुरुष मुलं याना स्वीकार करणं अवघड जाते ,मग रागाच्या भरात त्या संबंधीत महिला किंवा मुलीला अत्याचार किंवा मृत्यूला ही सामोरे जावे लागत. 

14. स्त्रियांच्या कर्तृत्वाची विषयी असणारी असूया.आपल्या समाजमनात मुळात मानसिकतेत अस बिबलेले आहे की महिला म्हणजे दुबळ्या आणि कमकुवत आणि नेहमी मोठ्या जबाबदारीचे काम ते करू शकत नाही यातूनच पुरुषांच्या मनात समानतेची भावना न राहता एक उच्च स्थानी आपण आहोत आणि या ठिकाणी कोणी पोहूचू शकत नाही,या भावनेला जेव्हा एखाद्या महिलांना आपल्या गुणवत्ता किंवा मेहनतीने ते कार्य किंवा पद जर मिळवलं तर तिथे दुर्देवाने असूया आणि महिला या एकाच विशेषनाणे ते प्राप्त झाले आहे हे समजून त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्या ऐवजी साशंक विचारातून बघितले जाते, परिणाम यातून महिलांवर अत्याचार किंवा हींसा होण्याची शक्यता असते.

15. हुंडा पध्दती किंवा पैसे, इतर गोष्टीची मागणीची पूर्तता न झाल्याने हिंसा.

16. कौटुंबिक हिंसाचार करण्यात सूनेविषयी सासू व इतर लोकांची मानसिकता ही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारास कारणीभूत आहे. कुटूंबात शुल्लक गोष्टींचा विपर्यास केला जावून कधी मार झोड तर कधी अगदी जिवंत हत्या केलेले उदाहरण समोर आलेले आहेत.

स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचाराचे बदलते स्वरुप

शिक्षणाने ज्या प्रमाणे समाजात स्त्रीला नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडण्याची संधी मिळाली त्या प्रमाणात स्वातंत्र्याची काही द्वार उघडे झाले त्याच प्रमाणात नवीन समस्येची जाणिव देखील होवू लागली. कार्यालयात काम करताना केवळ क्षमता आणि स्त्री आहे म्हणून काही बाबतीत डावलले जाते. तसेच तंत्रज्ञानाने काम करण्याची शैली नाही किंवा कार्यालयासाठी जास्त वेळ,किंवा कामानिमित्त एखादे प्रशिक्षण, मिटींग, सादरीकरण करण्यासाठी इतर ठिकाणी प्रवास करू शकत नाही,किंवा घरातूनच मुळात काही वेडंवाकडं होऊ शकत या मानसिकतेतून प्रवासाची संधी दिली जात नाही,परिणामी आपलं कोशल्य आणि असणारी स्किल्स चे योगदान न दिल्यामुळे देखील एक वेगळ्या दडपणाखाली किंवा आपल्या स्वतः मध्ये काही कमी आहे ही भावना वाढ होते,पर्यायाने कमकुवत असल्याच्या विचाराने आपल्यावर मानसिक अत्याचार तर होतो हे मुळात महिलाच मान्य करत नाहीत,आपल्या नोकरी, व्यवसाय मध्ये अधिकचा वेळ देवू शकत नाही म्हणून एका मानसिक विचारात अडकवून ठेवल्यामुळेआणि स्वतःही राहिल्यामुळे मानसिक हिंसेचा हा नवीन प्रकार समजण्यास आपल्याला हरकत नाही.

राजकारण आणि चित्रपट अथवा मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा वाढते प्रमाण

समाजमाध्यमाचा किंवा सोशिअल मीडिया चा वाढता प्रसार, प्रचार आणि वापर यामुळे विविध क्षेत्रातील नामवंत माहिलांना देखील ट्रोल होण्याचा प्रकार वारंवार होत असताना दिसतो. विशेषत: यामध्ये राजकारण आणि चित्रपट अथवा मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा वाढते प्रमाण आहे. कारण महिलांना या शेकडो अडचणीना सामोरे जावे लागत आहे. स्त्रियांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे स्वरुप देखील काळानुरूप बदललेले दिसते. बदल हा ज्याप्रमाणात पुरूषी मानसिकता योग्य किंवा समतोल भूमिकेत कुंटूबापासून स्वीकारत नाहीत तोपर्यंत हिंसेचे प्रमाण कमी होणार नाही. समाजाची सुरवात कुटुंबापासून होते तसेच स्त्री समानतेच्या विचाराची सुरवात देखील येथूनच होणं आवश्यक आहे.

शब्दांकन - मीरा ढास, सहायक संचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, लातूर.