esakal | नांदेड : चैनस्नॅचींग चोराकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त- संदीप शिवले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यावेळी त्यांच्या सापळ्यात चैनस्नॅचींग करणारा अट्टल चोरटा अडकला. त्याच्याकडून एक लाख १४ हजार ५५२ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी (ता. पाच) आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

नांदेड : चैनस्नॅचींग चोराकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त- संदीप शिवले

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गोळीबार प्रकरणातील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना दिले. यावरुन रविवारी (ता. चार) रात्री वजिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षक संदीप शिवले हे आपल्या गुन्हे शोध पथकासह गस्त घालत होते. यावेळी त्यांच्या सापळ्यात चैनस्नॅचींग करणारा अट्टल चोरटा अडकला. त्याच्याकडून एक लाख १४ हजार ५५२ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी (ता. पाच) आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

जुना मोंढा परिसरात रविवारी सायंकाळी दहशत पसरविण्याच्या कारणावरुन हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला होता. परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. या गंभीर घटनेनंतर पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या आदेशावरुन शहरात नाकाबंदी लावण्यात आली. त्यानंतर हल्लेखोरांचा शोध घेण्याच्या शहरातील सर्वच ठाणेदारांना देण्यात आल्या. वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनाही तश सुचना मिळताच त्यांनी आपल्या गुन्हे शोध पथकाला (डीबी) सतर्क केले. या पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनील पुंगळे यांना श्री. शिवले यांनी सुचना दिलया. 

हेही वाचा वाहनधारकांनो सावधान : पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या सुचनेवरुन वाहतूक शाखा जोमात

तारासिंग मार्केटमध्ये राज इलेक्ट्रॉनिक्स देना बँक चौकातन घेतले ताब्यात

श्री. पुंगळे यांनी आपले सहकारी दत्ताराम जाधव, बबन बेडदे, संजय जाधव, चंद्रकांत बिरादार, देवानंद मोरे यांना सोबत घेऊन रात्री आपल्या हद्दीत गस्त सुरु केली. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका दुचाकीवरील दोघआंनी दोन चैन स्नॅचींगचे गुन्हे करुन वजिराबाद हद्दीत पसार झाले. यावेळी तारासिंग मार्केटमध्ये राज इलेक्ट्रानीक्स देना बँक चौकात एका व्यक्तीला मारहाण होत असल्याची माहिती मिळाली. श्री. पुंगळे यांनी धाव घेऊन त्या युवकास ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर चौकशी केली. 

येथे क्लिक करा - बँक प्रशासन हादरले- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्टेट बँकेत

न्यायालयाने दिली पोलिस कोठडी

यावेळी शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चैनस्नॅचींग केल्याची कबुली दिली. शेख आमेर शेख पाशा (वय २२) रा. फारुखनगर, हिंगोली नाका, नांदेड असे आरोपीचे नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक सोन्याचे मिनी गंठण, एक चोरीचा मोबाईल आणि एक दुचाकी असा एक लाख १४ हजार ५५२ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. जप्त केलेली दुचाकी ही नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. या चोरट्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी वर्तविली आहे.