esakal | नांदेड - कोरोना चाचणीसाठी नागरीकांची भटकंती, सोमवारी २८३ कोरोनामुक्त, १६७ पॉझिटिव्ह तर पाच जणांचा मृत्यू   
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

सोमवारी (ता. २१) केवळ ६६१ आहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३९४ निगेटिव्ह तर १६७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू आणि २८३ रुग्णांची कोरोनावर मात

नांदेड - कोरोना चाचणीसाठी नागरीकांची भटकंती, सोमवारी २८३ कोरोनामुक्त, १६७ पॉझिटिव्ह तर पाच जणांचा मृत्यू   

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - आॅगस्टपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आलेल्या व्यक्तीच्या घरातील आणि आजूबाजूच्या सर्वांनाच कोरोनाची चाचणी करण्यासाठी स्वतः रुग्णवाहिकेतून चाचणीसाठी आणले जात असे. मात्र रुग्ण वाढल्याने व किटचा तुठवडा पडल्याने जिल्ह्यातील चाचणीचा वेग मंदावला आहे. मनात कोरोनाची भीती असलेले नागरीक मात्र स्वःतहून चाचणी साठी पायाला भवरा बांधुन भटकंती करताना दिसून येत आहेत. 

रविवारी (ता. २०) एक हजार १३२ स्वॅब आहवाल प्रलंबित होते. त्यापैकी सोमवारी (ता. २१) केवळ ६६१ आहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३९४ निगेटिव्ह तर १६७ जण पॉझिटिव्ह आढळून आले. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू आणि २८३ रुग्णांची कोरोनावर मात केल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली. 

हेही वाचा- धक्कादायक : शांतीधाम पाण्याखाली गेल्याने रस्त्यावरच अंत्यविधी ​

नागरीकांना कोरोनाची भीती 

जिल्ह्यात कोरोना टेस्ट किटचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ठिकाणी चाचण्या बंद ठेवाव्या लागत आहेत. कोरोनाची अती गंभीर लक्षणे असलेल्या व आवश्‍यक त्याच नागरीकांची चाचणी करण्यात येत आहे. मात्र ताप, सर्दी, खोकला, श्‍वास घेण्यास अडथळा, अंग, डोके दुखी सारख्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरीकांना कोरोनाची भीती वाटत आहे. त्यामुळे अनेकजण स्वःताहून तपासणीसाठी फिवर क्लिनिकमध्ये येत आहेत. परंतु अनेक ठिकाणी मर्यादित चाचण्या केल्या जात असल्याने त्यांना माघारी फिरताना ही लक्षणे घेऊन जायचे कुठे? असा प्रश्‍न पडत आहे. 

नऊ हजार ६६१ रुग्ण कोरोना मुक्त

सोमवारी दिवसभरात विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातून २१, जिल्हा रुग्णालयातील १०, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन व घरीच आयसोलेशनमध्ये असलेले १६४, माहूरचे सात, धर्माबादचे पाच, किनवटला १०, मुखेडला २०, देगलूरला एक, मुदखेडला १०, कंधारला आठ, नायगावला सात, हदगावला एक, जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सात आणि खासगी रुग्णालयातील १२ असे २८३ रुग्ण कोरोनामुक्क झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत नऊ हजार ६६१ रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत. 

जिल्ह्यातील मृत्यूचा आखडा ३६१ 

विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील चार व जिल्हा रुग्णालयातील एक अशा पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये विष्णुनगर नांदेड पुरुष (वय ७१), सुंदरनगर नांदेड महिला (वय ६५), डोरनाळी (ता. मुखेड) महिला (वय ५८), बाचोटी (ता. कंधार) पुरुष (वय - ६५), इंदिरानगर लोहा महिला (वय ५०) यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मृत्यूचा आखडा ३६१ इतका झाला आहे. 

हेही वाचले पाहिजे- बंडूनानाला दुपारी जेवण करुन झोपणे पडले महागात...

४७ रुग्णांची प्रकृती गंभीर  

सोमवारी नांदेड वाघाळा भागात ११५, नांदेड ग्रामीण पाच, कंधारला दोन, हदगावला चार, भोकरला एक, बिलोलीत पाच, देगलूरला एक, अर्धापूरला सात, किनवटला चार, नायगावला सहा, लोहा येथे आठ, धर्माबादला तीन, मुदखेडला एक, परभणीला दोन, यवतमाळला एक, लातूरचा एक असे १६७ जणांचे आहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ७२३ इतकी झाली आहे. त्यापैकी नऊ हजार ६६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सध्या तीन हजार ६३३ बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ४७ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

कोरोना मीटर 

एकुण पॉझिटिव्ह - १३ हजार ७२३ 
आज सोमवारी बाधित - १६७ 
एकुण बरे रुग्ण - नऊ हजार ६६१ 
आज सोमवारी बरे - २८३ 
एकुण मृत्यू - ३६१ 
आज सोमवारी मृत्यू - पाच 
उपचार सुरु - तीन हजार ६३३ 
गंभीर रुग्ण - ४७ 
अहवाल प्रलंबित - ७७०