

Nanded Cold Wave
sakal
नांदेड : गेल्या सहा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवत असून गुरुवारी (ता. १४) पहाटे किमान तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला. शुक्रवारीही थंडी चांगलीच जाणवू लागल्याने उबदार कपड्यांची मागणी वाढली आहे.