esakal | नांदेड : रब्बीसाठी विद्यूतप्रणालीची देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा- मुख्य अभियंता पडळकर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रब्बी हंगामात लागणाऱ्या पाणी उपशासाठी शेंतकऱ्यांना दर्जेदार व सुरळी वीज पुरवठा होण्यासाठी विज वाहिन्या व विद्युत प्रणालिच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती देवुन ती वेळत पूर्ण करावीत असे निर्देश

नांदेड : रब्बीसाठी विद्यूतप्रणालीची देखभाल व दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करा- मुख्य अभियंता पडळकर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : या वर्षीचा रब्बी हंगाम लवकरच सुरु होत आहे. या वर्षी झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये व विहिरींमध्ये सुध्दा मुबलक पाणीसाठा उपलब्ध् आहे. त्यामुळे रब्बी हंगामात लागणाऱ्या पाणी उपशासाठी शेंतकऱ्यांना दर्जेदार व सुरळी वीज पुरवठा होण्यासाठी विज वाहिन्या व विद्युत प्रणालिच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांना गती देवुन ती वेळत पूर्ण करावीत असे निर्देश महावितरणच्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी सर्व कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत आणि अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामात योग्य दाबाने व सुरळीत वीज पुरवठा करण्याचे निर्देशीत केलेले होते. त्यानुसार लघुदाब वाहिन्यांचे जोड व्यवस्थीत करणे, पीव्हीसी स्पेसर बसविणे रस्त्या लगतच्या व रस्ता क्रॉस करणाऱ्या वाहिन्यांच्या गार्डिंगची तपासणी करणे व आश्यकतेनुसार दुरुस्ती करणे अथवा नवीन गार्डिंग करणे. जीर्ण झालेल्या तारा व वीज खांब बदलणे,वाकडे झालेले पोल सरळ करणे, सैल झालेल्या तारा सरळ करणे, वीज खांबाचे आर्थिंग तपासणे, त्याच बरोबर उच्च्दाब वाहिनीची देखभाल व दुरुस्ती करणे. रोहित्रांच्या तेलाची गळती थांबविणे, आर्थिंग तपासणे, सिलिका जेल बदली करणे, डीओ फ्युज कॅपॅसिटी तपासणी व बदली करणे. 

बिघाड झालेल्या यंत्रणेत दुरुस्ती करा

उपकेंद्रामधील नादुरुस्त् सीटी, पीटी, ब्रेकर, रोटरी स्वीच बदली व दुरुस्त् करणे, आयसोलेटर, बॅटरी चॅर्जरची देखभाल करणे तसेच, उपकेंद्रामधील वाहिनी व रोहित्रांचे प्रोटेक्श्न चाचणी विभागाकडुन तपासणी करणे अशा प्रकारची कामे विहित वेळेत पुर्ण करण्यात यावीत अशा सुचना मुख्य् अभियंता श्री पडळकर यांनी परिमंडळातील सर्व विभाग प्रमुखांना दिले आहेत.

हेही वाचाएकीकडे शॉर्टसर्किने तर दुसरीकडे आगीमुळे ऊस जळून खाक 

रब्बी हंगामाचे सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याकडे गांभिर्याने लक्ष देण्याच्या सुचना

कृषी वाहिनी वरील वारंवार नादुरुस्त होणाऱ्या रोहित्रांची तपासणी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. मोबाईल ॲपच्या माध्यमातून नादुरूस्त रोहित्रांची नोंद करण्यात यावी. एकाच ठिकाणी वारंवार नादुरुस्त् होणाऱ्या रोहित्रांच्या कारणांची योग्य् ती दखल घेवुन व त्यावर उपाययोजना करुन तिथे रोहित्र बसविण्यात यावे. रोहित्रांच्या नादुरुस्तीचे प्रमाण कमी होऊन वीज पुरवठा सुरळीत मिळेल या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील अनधिकृत कृषीपंपाच्या वापरावर निर्बंध आणावेत अशा सुचनाही मुख्य अभियंता श्री पडळकर यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर सर्व अधीक्षक अभियंत्यांनी रब्बी हंगामाचे सर्व कामे वेळेत पूर्ण होतील याकडे गांभिर्याने लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.

--

loading image