Nanded Constituency Lok Sabha Election Result: अशोक चव्हाणांच्या नाराजीचा भाजपला फटका! काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचा विजय

Nanded Lok Sabha Election Result 2024 BJP Pratap Chikhalikar defeated Congress Wasant Chavhan wins : नांदेडमध्ये विद्यामान खासदार प्रतापराव चिखलीकर विरुद्ध विद्यमान आमदार वसंतराव चव्हाण अशी लढत झाली.
Nanded Constituency Lok Sabha Election Result: अशोक चव्हाणांच्या नाराजीचा भाजपला फटका! काँग्रेसच्या वसंत चव्हाणांचा विजय

Nanded Lok Sabha Election Result 2024 : नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. याचाच फटका भाजपला नांदेडमध्ये बसला असून विद्यमान खासदार प्रताप चिखलीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा विजय झाला आहे.

मोदींच्या २०१४ च्या झंझावातातही महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून येण्याची कमाल करणारे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यंदा २०२४ च्या निवडणुकीत मात्र भाजपत गेले आहेत. नांदेड म्हणजे अशोक चव्हाण आणि काँग्रेस असंच आजवर चित्र होतं. २०१९ च्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला असता पण वंचितच्या उमेदवारामुळं त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

पण आता यंदाची परिस्थिती वेगळी आहे. अशोक चव्हाण भाजप गेले असल्यानं आणि राज्यसभेवर खासदार झालेले असल्यानं ते आता भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर यांच्यासाठी जोर लावला. परंतू भाजप गेल्यानं चव्हाणांविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये प्रचंड रोष होता. त्यातच यंदा वंचित आणि एमआयएमचाही उमेदवार इथं रिंगणात आहेत.

यंदा किती झालं मतदान?

दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी नांदेड लोकसभेसाठी मतदान झालं. यामध्ये एकूण ६०.९४ टक्के मतदान झालं. नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध समाजांचं अस्तित्व आहे. शीख समाजही इथं मोठ्या प्रमाणावर वसला आहे. गेल्यावेळच्या तुलनेत यंदाच्या मतदानात तब्बल ५ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१९ च्या निवडणुकीत नांदेडमध्ये ६५.१६ टक्के मतदान झालं होतं. त्यामुळं यंदा घटलेल्या मतदानाचा फटका नेमका कोणाला बसतो हे पहावं लागणार आहे. त्याचबरोबर गेल्यावेळेप्रमाणं इथं वंचित फॅक्टर किती महत्वाचा ठरतोय, हे पाहावं लागणार आहे.

२०१९ मध्ये अशी होती स्थिती?

प्रताप पाटील चिखलीकर (भाजप) विजयी मते : ४, ८६,८०६

अशोक चव्हाण (काँग्रेस) मते : ४,४६,६५८

डॉ. यशपाल भिंगे (वंचित) मते : १,६५, ३४०

विजयी उमेदवारांचे मताधिक्य : ४०,१४८

यंदाच्या निवडणुकीत गाजलेले मुद्दे

एकही मोठा उद्योग नसलेला जिल्हा, त्यामुळं स्थानिक तरुणांचा रोजगाराचा प्रश्न गंभीर

साखर कारखाने आहेत, पण शेतीपूरक उद्योग नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांना प्रोत्साहन नाही.

वाढती बेरोजगारी आणि नोकरी, कामासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

रेल्वे मार्ग, विद्युतीकरणाचे काम संथगतीने, वंदे भारतची मागणी

विधानसभा क्षेत्रात झालेलं मतदान

1) भोकर - ६५.३७ टक्के

२) देगलुर - ५९.८२ टक्के

३) मुखेड - ५६.७६ टक्के

४) नायगाव - ६५.३२ टक्के

५) नांदेड उत्तर - ५८.५३ टक्के

६) नांदेड दक्षिण - ६०.२८ टक्के

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com