नांदेड : वादग्रस्त रेल्वे ठेकेदार एस. के. वल्लीचे बील रोखण्यासाठी सीटूचे डीआरएम कार्यालयासमोर उपोषण

file photo
file photo

नांदेड : सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनचे युनिट नांदेड रेल्वे स्थानकात दोन वर्षापूर्वी कॉ. विजय गाभणे आणि कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आले आहे. एच. एम. एस. रेल्वे कर्मचारी युनियनचे पदाधिकारी शेख यासिन यांच्या वतीने त्यांना लढता येत नसल्यामुळे त्यांनी सीटूकडे नोंद करण्यास सफाई कामगारांना प्रावृत केले होते. 

मोठ्या प्रमाणात सफाईदार कामगार दलित व अन्यायग्रस्त पिडीत असल्यामुळे डी. आर. एम. नांदेड कार्यालयापूढे सतत तेवीस दिवस व नांदेड कलेक्टर कार्यालयासमोर पाच दिवस अमरण उपोषण व धरणे आंदोलन करून रेल्वे ईएनएचएम आर. मंगाचार्यलू व रेल्वे ठेकेदार एस. के. वल्ली यांच्यासह इतर चार जनांवर सीटूच्या संघर्षशिल लढ्यातून ता. ७ जानेवारी २०२० रोजी पो. स्टे. वजिराबाद येथे अनुसूचीत जाती, जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सीटूच्या पदाधिका-यांना साम, दाम, दंड, भेद नीतीवापरुन तडजोड करण्याचा शर्थीचा प्रयत्न संबंधित आरोपींनी केला होता. परंतु तडजोड झाली नसल्यामुळे गैरमार्गाने मार्ग काढण्यात आरोपी यशस्वी झाले  होते. तसेच सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांच्यावर या संदर्भाने हल्ला देखील झाला होता तशी नोंद पो. स्टे. वजिराबाद येथे आहे. परंतु दुर्दैवाने तत्कालीन उप विभागीय पोलिस अधिकारी अभिजित फस्के यांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत मुख्य आरोपी रेल्वे अधिकारी आर. मंगाचार्यलू व ठेकेदार एस. के. वल्ली यांची नावे अर्थपूर्ण व्यवहारातून दोषारोप पत्रातून वगळली आहेत. ती नावे पूर्ववत घ्यावेत या साठी न्यायालयात व शासन स्तरावर लढा चालूच आहे.

विशेषतः या प्रकरणात शेख यासिन व युनियनचे वकील पत्र घेतलेले सहकारी वकील युनियन सोबत कुरघोडी करताना सिध्द होत आहे. युनियनच्या पदाधिका-यांना विश्वासात न घेता आरोपी एस. के. वल्ली व मंगाचार्यलू यांना कामगारांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन आतल्या मार्गाने मदत करीत आहेत. आरोपी एस. के. वल्ली याला पन्नास लाखाचे बील सहज मिळायला हवे या साठी आर. मंगाचार्यलू यांच्यावर दबाव आणत आहेत. या दलित कामगार  कार्यकर्त्यांची बाजू मांडण्याचा बनाव करणाऱ्या टोळीचा सी. डी. आर. तपासणी केला तर रेल प्रबंधक कार्यालय नांदेड विभागात देखील जातीयवादी भ्रष्ट टोळी उघडकीस येण्याची शक्यता आहे. कारण दलित कामगारांप्रति सहानुभूती दाखविण्याचे ढोंग करणारे काहीजण कामगारांच्या विरोधात असणाऱ्या दोषींनाच मदत करीत असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच केंद्रीय श्रम कार्यालय चंद्रपूर येथे प्रकरण चालू असून एस. के. वल्ली याचे बील देण्यात येऊन नये असे श्रम कार्यालयाचे निर्देश आहेत. श्रम कार्यालयाचे पत्र स्वतः दिल्याचे पत्र कॉ. अनुराधा परसोडे यांनी पोलिस निरीक्षक विमानतळ, डी. आर. एम.नांदेड यांना स्वतः प्रत्यक्षात भेटून दिले आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी लावून धरण्यात येईल व संबंधिता विरोधात ॲट्रॉसीटीसह इतर गुन्हे दाखल करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार असल्याचे सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा युनियन अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी बोलून दाखविले आहे.

वादग्रस्त एस. के. एन्टरप्रायजेसचे बील रोखावे म्हणून ता. २२ मार्च रोज सोमवारी सकाळी साडेअकरापासून कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे,कॉ. शेख मगदूम पाशा व कॉ. सं. ना. राठोड हे विभागीय रेल प्रबंधक कार्यालया नांदेडसमोर अमरण उपोषणास बसले होते.
उपोषणास पाठिंबा देण्यासाठी भाकप युनायटेडचे राज्य उपाध्यक्ष कॉ. प्रा. इरवंत सुर्यकार, जिल्हा महासचिव कॉ. प्रा. देविदास इंगळे हे स्थळी हजर होते तसेच पिडीता मजदूर कॉ. अनुराधा परसोडे, कॉ. मीरा बहादूरे, कॉ. सीमा गजभारे आदी सफाई कामगार महिला उपोषणार्थी सोबत होत्या. रेल्वे अधिकारी व ठेकेदाराकरवी उपोषणार्थींवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला असून निवेदन घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे निवेदने राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रशासनाकडे वर्ग केले आहेत. उपोषणस्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस जी. जे. पाईकराव, कर्मचारी जीलानी, आर. पी. एफचे एस.व्ही. जाधव, पोलिस स्टेशन विमानतळचे गोपनीय शाखेचे  एस. व्ही. केंद्रे यांच्या तोंडी  विनंती वरुन व कोविड 19 च्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे उपोषण तूर्त मागे घेण्यात आले.

संबंधित सहानुभूतीचा आव आणणारे व्यक्ती युनियन च्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी भ्रष्ट अधिकारी व ठेकेदाराला मधल्या मार्गाने सहकार्य करीत आहेत.
- कॉ. गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सीटु

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com