esakal | नांदेड कोरोना ः आज दिवसभरात १० पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

शुक्रवारी (ता.१२) नव्याने सापडलेल्या दहा पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या २३४ वर पोहचली आहे. एकाबाजुला बाधितांची संख्या वाढली तर दुसऱ्या बाजूला पंजाब भवन यात्रीनिवास येथे उपचार सुरु असलेल्या २१ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली

नांदेड कोरोना ः आज दिवसभरात १० पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच २१ रुग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

शुक्रवारी (ता.१२) नव्याने सापडलेल्या दहा पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या २३४ वर पोहचली आहे. एकाबाजुला बाधितांची संख्या वाढली तर दुसऱ्या बाजूला पंजाब भवन यात्रीनिवास येथे उपचार सुरु असलेल्या २१ बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

हेही वाच - नांदेडात आजही कोरोनाने घेतला दोघांचा बळी, एक पॉझिटिव्ह ​

शुक्रवारी २१ रुग्ण कोरोना मुक्त 

शुक्रवारी (ता.१२ जून) नव्याने सापडलेल्या दहा बाधितांमध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा व एका मुलिचा समावेश असल्याचे सांगण्याय येत आहे. सापडलेल्या सात पुरुष रुग्णांचे वय २२, २६, ३०, ३६, ४९, ५५ आणि ६१ असे आहे तर महिलांचे वय २०, ५५ व एका पाच वर्षाच्या मुलीचा यात समावेश आहे. आतापर्यंत एकुण १६० व्यक्ती कोरोनाच्या आजारातून मुक्त झाले आहेत.

शुक्रवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील एका ७४ वर्षीय पुरुषाचा आणि शहरातील चौफाळा भागातील ५२ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या दोन्ही रुग्णांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे उपचार सुरु होते. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास, मधुमेह आदी आजार होते. आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.

हेही वाच - लॉकडाउन: लाचेचा मोह सुटेना, नांदेड परिक्षेत्रात १४ सापळे ​

११३ स्वॅब अहवाल येणे बाकी

शुक्रवार (ता.१२) जून ४७ अहवाल प्राप्त झाले आहेत.  त्यापैकी ३७ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत ६१ रुग्णांवर औषधोपचार चालू असून यातील पाच बाधितांपैकी ५०, ६५ वर्षाच्या दोन महिला आणि ३८, ५२ व ५४  वर्षाचे तीन पुरुष यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले. शुक्रवारी ११३ संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल शनिवारी (ता.१३ जून) सायंकाळपर्यंत प्राप्त होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.

नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा व सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास सतर्क करण्यास मदतगार ठरु शकतो. तेव्हा आफवावर विश्वास ठेवू नये.  जनतेने प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

loading image